ठाकरेंसोबत राहिल्यानं त्रास होईल हे माहिती होतं; एसीबीकडून घराच्या झाडाझडतीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

Rajan Salvi reaction after the ACB raid on house: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घराची एसीबी झाडाझडती घेत आहे. यावर साळवी यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Rajan Salvi reaction after the ACB raid on house
Rajan Salvi reaction after the ACB raid on house

रत्नागिरी- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घराची एसीबी झाडाझडती घेत आहे. यावर साळवी यांनी प्रतिक्रिया दिलीये. राजकीय सुडातून कारवाई होत आहे. मी त्यांचे स्वागत केले आहे. अटकेला मी घाबरत नाही. मला हे अपेक्षित होतं. पण, अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. माझ्या कुटुंबाला आणि जनतेला सत्य माहिती आहे. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. माझी आणि भावाची एसीबी चौकशी सुरु आहे. माझ्या आणि भावाच्या घरांची झाडाझडती सुरु आहे. आज ना उद्या हे होणारच होतं हे मला माहिती होतं, असं ते म्हणाले.

कालपासून याची कुणकुण लागली होती. ठाकरेंसोबत राहिल्यानं त्रास होईल याची कल्पना होती. पण, मी कायम ठाकरेंसोबतच राहणार आहे. मी अत्यंत संयमी आणि शांत आहे. उद्धव ठाकरे आणि पक्ष माझ्या पाठिशी आहे. कितीही त्रास झाला तरी ठाकरेंसोबतच राहीन, असं राजन साळवी म्हणाले. (staying with Thackeray would cause trouble Rajan Salvi reaction after the ACB raid on house)

Rajan Salvi reaction after the ACB raid on house
PM Modi in Mumbai: मोदींच्या कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळले म्हणून खासदार राजन विचारेंची खवचट टीका

राजन साळवी यांची आतापर्यंत सहावेळा एसीबी चौकशी झाली आहे. राजन साळवी, त्यांचे बंधू आणि कुटुंबीय यांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. एसीबीच्या सूचनेनुसार राजन साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचे मूल्यांकन तपासण्यात आले होते. राजन साळवी यांचा अडचणी वाढताना दिसत आहे.

Rajan Salvi reaction after the ACB raid on house
Rajan Salvi : 'मला अटक झाली तरी चालेल, पण पुन्हा ACB च्या चौकशीला जाणार नाही'; आमदार राजन साळवी संतापले

राजापूरचे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं आहे. मात्र, सध्या विरोधातील नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. साळवी यांच्या संपत्तीचे मूल्यांकन करण्यात येत आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबाबापोटी सुरु असल्याचा दावा साळवी यांच्याकडून करण्यात आला आहे. भविष्यात साळवी यांच्याविरोधात आणखी काही कारवाई होते का? हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com