

Farmers are embracing stingless bees for eco-friendly honey production and pollination. This new approach boosts biodiversity, supports sustainable agriculture, and offers a gentle alternative to traditional beekeeping.
Sakal
- राजेंद्र बाईत, राजापूर
निसर्गसाखळी आणि जैवविविधता कायम राखण्यास इवल्याशा मधमाशीची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे मधमाशीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सार्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. मधमाशीचे पालन वा संगोपन करणे आव्हानात्मक असले तरीही, मध संकलन, फलोत्पादन आदी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेला शेतीपूरक व्यवसाय यामुळे मधमाशी पालन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असे दोन्ही तऱ्हेने फायदेशीर आहे. कोकणातील वातावरणाला पूरक अशा मधमाशांच्या प्रजातीची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी मधाचे गाव ही संकल्पना शासनाने राबविण्यास सुरवात केली आहे. तळवडे गावाची त्यासाठी निवड झाली आहे. रोजगारनिर्मितीसह फळबागांमधील उत्पादनाला चालना देणाऱ्या आणि पर्यायाने आर्थिक बळ देण्यात महत्वाची ठरेल अशा मधुमक्षिका पालनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना त्याला किफायतशीर व्यावसायिक आयाम मिळणे गरजेचे आहे.