esakal | कोकणचा हापूस डायरेक्ट व्हिक्‍टोरिया राणीस; आंतरराष्ट्रीय मार्केट झाले खुले

बोलून बातमी शोधा

कोकणचा हापूस डायरेक्ट व्हिक्‍टोरिया राणीस; आंतरराष्ट्रीय मार्केट झाले खुले

कोकणचा हापूस डायरेक्ट व्हिक्‍टोरिया राणीस; आंतरराष्ट्रीय मार्केट झाले खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणचा आंबा जगावर राज्य करतो, याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी. पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमे फ्रामजी यांनी लावली. त्यानंतर 'बाँबे मॅंगो' म्हणून ते प्रसिद्ध झाले. आंबे निर्यात करून पैसे कमवायची त्यांनी शक्कल लढवली. पण, पारतंत्र्यामुळे ते शक्‍य नव्हते. मग त्यांनी एका करंडीत आंबे भरून १८ मे १८३८ ला भारतातून जहाजातून पहिली आंब्याची करंडी निर्यात केली. हे आंबे इंग्लंडच्या व्हिक्‍टोरिया राणीला पाठविले होते आणि आंब्याला आंतरराष्ट्रीय मार्केट खुले झाले. आजही कोकणचा हापूस आंबा जगावर राज्य करतो, याच सारे श्रेय फ्रामजी यांना जाते.

यासंदर्भात कोकणचे अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमे फ्रामजी यांनी लावली. तीन वर्षात ही रोपे बहरून, त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मॅंगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात प्रसिद्ध झाले. इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले. त्या आंब्याची लज्जत व स्वाद इंग्लंडपर्यंत पोचला. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येतील, याचा त्यांनी निश्‍चय केला.

हेही वाचा: ब्रेकिंग; लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट

पारतंत्र्यामुळे असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते. त्यामुळे राणीला करंडी पाठवून त्यांनी प्रयोग केला. राणीलाही आंबे आवडले आणि नंतर हळुहळू निर्यात सुरू झाली. कुलाबा ते परळपर्यंत मुंबई होती. १७९९ मध्ये ब्रिटिश मुंबईत स्थिरावत होते. ब्रिटिश मुंबईत स्थिरावल्यावर १८२९ मध्ये पवईचे भाग्य उजळले. पारसी असलेल्या फ्रामजी यांनी सरकारकडे अर्ज केला की, पवई परिसर लीजवर मिळावा. तिथे विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी याची सोय केली. फ्रामजी यांना जमिनीचा पैसा मिळत होता आणि त्यांनी पवईचा चेहरामोहरा बदलला.

छोटा साखर कारखानाही केला सुरू

फ्रामजी हे पहिले जस्टीस ऑफ पिस, धोबीतलाव बांधणारे, मुंबईला गॅस लाईट पुरविणारे, मुंबई पाणी योजनेचे प्रणेते, एलफिस्टन कॉलेजचे संस्थापक. फ्रामजी यांनी पवईत आंब्याप्रमाणे मलबेरीची झाडे लावली, रेशीम उत्पादन सुरू केले, ऊस लावला, छोटा साखर कारखाना सुरू केला.

हेही वाचा: अमेरिकेनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकवर याचीच धुम; ओव्हर द टॉप

एक नजर...

  • पवईच्या परिसरात आंब्याची एक लाख कलमे लावली

  • फ्रामजी कावस बॉम्बे मॅंगो या नावाने झाले प्रसिद्ध

  • ब्रिटिश अधिकारी पवईच्या आंब्यासाठी झाले वेडे

  • आंब्याची लज्जत व स्वाद इंग्लंडपर्यंत पोचला

  • पारतंत्र्यामुळे आंबे परदेशात विकणे होते अशक्‍य

  • राणीला करंडी पाठवून त्यांनी केला प्रयोग

  • राणीलाही आंबे आवडले, हळूहळू निर्यात सुरू