esakal | रेस्क्‍यू टीमच्या चार तासांच्या शोधाला आले यश ; आणि त्याचाही वाचला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

street dog head serve in the box rescue officers help a dog to remove this in sawantwadi

सिंधुदुर्गातील वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यू सर्व्हीसेसच्या मदतीने त्याची सुटका झाली

रेस्क्‍यू टीमच्या चार तासांच्या शोधाला आले यश ; आणि त्याचाही वाचला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : पाळीव प्राण्यांना त्यांचे मालक घरातल्या सदस्याप्रमाणे जपत असतात. परंतु भटक्‍या प्राण्यांना कुणीच वाली नसतं. अशा भटक्‍या प्राण्यांना ते जर एखाद्या संकटात असतील किंवा त्यांना मानवी अधिवासात आल्यानंतर पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी म्हणून त्यांच्या मदतीला धावून येतात. असाच एक प्रसंग बुधवारी (२) ओरोस येथे घडला. भटक्‍या कुत्र्याच्या डोक्‍यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकली होती. सिंधुदुर्गातील वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यू सर्व्हीसेसच्या मदतीने त्याची सुटका झाली. 

हेही वाचा - कोकणकरांनो सावधान ; अन्यथा तुमची दुकाने सील  

एका भटक्‍या कुत्र्याच्या डोक्‍यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी पाहिले. त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीचे प्राणीमित्र आंबोलीतील काका भिसे यांना फोन केला. भिसे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत वाईल्ड लाइफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनिल गावडे यांच्याशी संपर्क साधला. श्री. गावडे यांनी वेळ न दवडता लागलीच या कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

अर्धा दिवस शोध घेऊनही कुत्रा सापडू शकला नाही. मग पुन्हा ते आपल्या स्वयंसेवकांसह पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून ओरस येथे शोध मोहीम सुरू केली. जवळपास चार तास शोधमोहीम केल्यानंतर त्यांना तो कुत्रा कचरा डेपो येथे आढळला. त्यांनी त्या कुत्र्याला पकडले व त्याच्या डोक्‍यातील ती बरणी कटरच्या साह्याने कापून काढली. कुत्र्याच्या डोक्‍यात बरणी बरेच दिवस असल्याचे लक्षात आले कारण कुत्रा अशक्तही झाला होता व त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गावडे यांनी त्या कुत्र्यावर उपचार करून पुन्हा त्याला सुरक्षितरित्या सोडून दिले. 

हेही वाचा -  कोकणातला मासा सातासमु्द्रापार ; इतक्या कोटीची रोज होतेय उलाढाल

वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्‍यू सर्व्हीसेसच्या मोहिमेमध्ये गावडे, आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, डॉ. प्रसाद धुमक, महेश राऊळ, नंदु कुपकर, सिद्धेश ठाकुर, दीपक दुतोंडकर आदी सहभागी झाले. 

संपादन - स्नेहल कदम