esakal | गावा गावात वाढतेय लोकांची संख्या अन्......

बोलून बातमी शोधा

stress on the system have the administrative in othavane sindudurg kokan marathi news

लॉक डाउन असताना बाधित क्षेत्रातील अनेक जण गावात...
गावातील प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण..

गावा गावात वाढतेय लोकांची संख्या अन्......
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओटवणे (सिंधुदुर्ग) : लॉक डाउन असताना देखील गावा गावात पर जिल्ह्यातून किंवा पर राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत तसेच आरोग्यकेंद्र ,उपकेंद्रावर कमालीचा ताण येत आहे.

लॉक डाउन असताना मुंबई,पुणे,तसेच गोव्यात अडकलेली अनेक युवक युवती कामगार ,काम नसल्याने आपल्या गावी परतत आहेत.ज्यांच्या कडे गाड्या आहेत असे लोक खाकी नजर चुकवत किंवा चालत राना वनातून मार्ग काढत गावी पोहचत आहे.त्यामुळे गावात कोरोना बाधित क्षेत्रातून येणाऱ्यांची संख्या वाढत असून स्थानिक आरोग्य अधिकारी व यंत्रणेवर यांचा कमालीचा ताण वाढत आहे.

हेही वाचा- सायब रासन मिलेगा क्या?   त्या महिलांनी विचारला प्रश्न अन्....

गावातील प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण

या बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना फक्त होम क्वारंटाईन केल्या शिवाय तपासणी करण्याची कोणतीच साधने गावात उपलब्ध नसल्याने या बाहेरून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण आहे की नाही कळत नाही.तर गावातील एकंदरीत मोठे क्षेत्र व वर्दळ कमी असल्याने काहींची आल्याची माहिती भीती पोटी लपवली जाते.तसेच विलिगीकरणात राहण्यास सांगितलेल्या या व्यक्ती प्रत्यक्ष घरी थांबतात कि नाही याबाबत त्यांना 24 तास निगराणीखाली ठेवण्या इतपत ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा आरोग्य केंद्राकडे प्रशासकीय कुमक उपलब्ध नाही.त्यामुळे ग्रामीण भागात अशा व्यक्ती पासून भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याची चिन्हे आरोग्य अधिकारी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा- त्या वृद्धाचा मृत्यू कोरोना मुळे नाही झाला तर.....

आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढेल 

हातावर पोट घेऊन कामानिमित्त गोवा,मुंबई,पुणे शहरात राहणाऱ्या व्यक्ती आता कामच नसल्याने कुठल्याही परिस्थितीत गावी येण्यासाठी धडपड करीत आहेत. लोकांचे त्याठिकाणी पुरतेच हाल होत असून स्थानिक प्रशासनाने त्यांची गैरसोय दूर केल्यास गावाकडे वाढत जाणारे लोंढे कमी होतील. अन्यथा तसे न घडल्यास कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावा बरोबरच ग्रामीण आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत जाईल.
  उत्कर्षा उमेश गांवकर, सरपंच ओटवणे