' सायब रासन मिलेगा क्या? ' त्या महिलांनी विचारला प्रश्न अन्....

The plight of the ordinary family working daily kokan marathi news
The plight of the ordinary family working daily kokan marathi news

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन केल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या सामान्य कुटुंबाचे हाल होत असल्याचे भयानक चित्र दिसू लागले आहे. अशीच परिस्थिती निर्माण झालेल्या तीन महिलांनी मंडणगड नगरपंचायत कार्यालय गाठत मुख्याधिकारी संतोष माळी यांना विचारलं, ' सायब, रासन मिलेगा क्या? क्षणभरासाठी अस्वस्थ झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाला कृतीतून उत्तर देत हा सोडवणूक करीत हाताला कामही दिलं. मात्र काय परिस्थिती निर्माण होवू पाहत आहे या विचाराने त्यांच्यातील अस्वस्थता वाढत गेली.
  मंडणगड नगरपंचायत कार्यालयात तीन महिला आल्या. त्यांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांची भेट घेतली. त्यावेळी माळी यांनी काय काम आहे अशी विचारणा करताच, त्यातील एक महिला म्हणाली, सायब, रासन मिलेगा क्या? त्या रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला होत्या. लौकडाऊनमुळं काम बंद झालं होतं. हातावर पोट असणाऱ्या कुटुंब त्या चालवित होत्या. चार-पाच दिवस घरात बसून रोजगार बुडाला होता. घरातील पैसे संपले होते आणि राशन सुध्दा! मोठ्या आर्जवीने विचारीत होत्या... ' सायब रासन मिलेगा क्या? यावर या परिस्थितीत हे रेशनिंगचं कार्यालय नाही तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन विचारा की राशन कधी मिळणार आहे अशी उत्तरे देऊन प्रश्न सुटत नाहीत हे माळी यांनी जाणलं.

पाणी फाऊंडेशन आले मदतीला

फक्त आपल्या पुढची लोकं फक्त बाजूला करता येतात. सायब रासन मिलेगा क्या?" हा मूळ प्रश्न आहे तसाच राहतो आणि हीच भारतीय जनता मग ' सिस्टीम ' नावाच्या बेगडी व्यवस्थेला नावं ठेवत राहते. या प्रश्नाचं उत्तर संतोष माळी यांनी आपल्या पद्धतीने सोडविलं. मंडणगड पाणी फाऊंडेशन हे मंडणगडचा पाणी प्रश्र्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नागरीकांचं व्यासपीठ आहे. सध्या मंडणगड पाणी फाऊंडेशन कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर विधायक स्वरूपाचं काम करीत आहे. माळी यांनी लगेच फाऊंडेशन प्रमुख श्रीपाद कोकाटे यांना फोन केला. त्यांनी लगेच रेशन कीट देण्याची तयारी दाखवली.

चेहऱ्यावर उमटले समाधानाचे भाव

तीन रेशन कीट (तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मसाला) घेऊन आले सुद्धा. सायब रासन मिलेगा क्या?" ह्या प्रश्नांचं उत्तर त्या महिलांना मिळालं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. मात्र १४ एप्रिलपर्यंत लौकडाऊन असल्याने पुढे काय याची तरतूद करता येईल म्हणून विचारणा केली असता त्या तिघींना शिवणकाम येत असल्याचे समजले. कापडी मास्क शिवण्याचे काम देत कापड विकत घेऊन दिलं. त्या तिघीही आनंदाने तयार झाल्या. त्यांना राशन मिळालं होतं आणि हाताला काम सुद्धा.

मनाला विचारलेल्या प्रश्नांना परिस्थितीने  दिले उत्तर
सायब रासन मिलेगा क्या? हा प्रश्न जर आपण सोडवू शकत नसलो तर त्या जोडीने अनेक अनुत्तरित प्रश्न तयार होतात. सिस्टीम जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे की अडवणूक करण्यासाठी? सरकारी कार्यालयात खुर्चीत बसणारी व्यक्ती नक्की कोण? अधिकारी की लोकसेवक? मनाला विचारलेल्या प्रश्नांना परिस्थितीने उत्तर दिले होते.
- संतोष माळी, मुख्याधिकारी, मंडणगड नगरपंचायत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com