सकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला

अमित गवळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा आकर्षक फलक लावण्यात आला आहे. येथील कला शिक्षक चंद्रकांत देवरे यांनी हा माहिती फलक तयार केला आहे. 

पाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा आकर्षक फलक लावण्यात आला आहे. येथील कला शिक्षक चंद्रकांत देवरे यांनी हा माहिती फलक तयार केला आहे. 

ही स्पर्धा विनामुल्य असुन चित्र काढण्यासाठी कागद व विषय सकाळकडून पुरविला जातो. रंगसाहित्य मात्र प्रत्येकाने सोबत घेऊन यावे. स्पर्धेसाठी अ, ब, क, ड असे चार गट आहेत. 'अ गटात इयत्ता पहिली व दुसरी, 'ब' गटात इयत्ता तिसरी व चौथी आहे. अ आणि ब गटासाठी स्पर्धेची वेळी सकाळी साडे अकरा ते साडेबारा, 'क' गटात इयत्ता पाचवी ते सातवी आणि 'ड' गटात इयत्ता आठवी ते दहावी आहे. क आणि ड गटासाठी स्पर्धेची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी आहे. विद्यार्थी थेट स्पर्धा केंद्रावर उपस्थित राहून स्पर्ध्येत सहभागी होऊ शकतात.

शहरी भागासह ग्रामिण भागातील स्पर्धकांचा या स्पर्धेसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. पाली स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलचे कला शिक्षक चंद्रकांत देवरे, प्रकाश पाचपांडे आणि जानकीबाई लिमये शाळेचे शिक्षक शेखर राऊत यांनी सांगितले की स्पर्धेसंदर्भात नाव नोंदणी करण्यासाठी विदयार्थी मागील अनेक दिवसांपासून विचारणा करत आहेत. अनेकांनी नोंदणी देखील केली आहे.

मागील स्पर्धेत सुधागड तालुक्यासह रोहा, नागोठणे, सुकेळी येथिल अनेक शाळांतील विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. तसेच आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी देखील विशेष सहभाग घेतला होता. या वर्षी सुद्धा असाच उदंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी सुएसोचे अध्यक्ष वसंत ओसवाल व ग.बा. वडेर हायस्कुल व वसंत ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अजय पाटील यांनी केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक व हितचिंतकांची अमुल्य मदत मिळते.

विदर्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व कल्पनेच्या पंखांना उंच भरारी देणाऱ्या ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेची सर्वांनाच उत्सूकता असते. स्पर्ध्येत विद्यार्थ्यांच्या मुक्त व सृजनात्मक भावभावनांचा अविष्कार पहायला मिळतो. 
- चंद्रकांत देवरे, कला शिक्षक, ग.बा. वडेर हायस्कुल

Web Title: students are exited for Sakal drawing competition