महाड - विद्यार्थ्यांनी जत्रेत घेतले व्यावसायिक शिक्षणाचे धडे

महाड - विद्यार्थ्यांनी जत्रेत घेतले व्यावसायिक शिक्षणाचे धडे

महाड : जत्रा म्हणजे उत्साह, भरपूर आनंद अशा उल्हासित जत्रेत खूप काही अनुभवयाला मिळते. याच जत्रेचा वलंग येथील शिक्षकांनी मुंलांसाठी एक शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग केला.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसयिक कौशल्येही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत यासाठी महाड तालुक्यातील वलंग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी वलंग गावच्या जत्रेत इडली आणि चहाचा स्टॉल टाकून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे घेतले. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आयबीटी) विषयांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. येथे पर्यावरण विषयक जागरुकता करत इडली विक्रिसाठी कागदी पिशव्यांचा वापरही करण्यात आला.

वलंग शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू इंग्लिश स्कुल, वलंग ही शाळा मूलभूत तंत्रज्ञानाचा विकास साधण्यासाठी, उद्योजकता वाढविण्यासाठीचे शिक्षण देणारी शाळा आहे. 2017-18 वर्षापासून आयबीटी विषयांतर्गत अभियांत्रिकी,ऊर्जा आणि पर्यावरण, शेती आणि पशुपालन, गृह आणि आरोग्य हे उपविषय शिकविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय 25%,पॉलीटेक्निकसाठी 15%, 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी 40 % अशाप्रकारे उपलब्ध जागांपैकी आरक्षित जागा म्हणून सूट मिळते.

अभियांत्रिकी विषयांतर्गत विद्यार्थी आता चांगल्याप्रकारे वेल्डिंग करत आहेत.ऊर्जा आणि पर्यावरण अंतर्गत लाईट फिटिंग शिकले आहेत.तर शेती आणि पशुपालन अंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मेथीची लागवड करून त्याची विक्रीही केली आहे.विद्यालयात आयबीटी विषय अंतर्भूत करण्यासाठी प्राईड इंडिया महाडचे विशेष सहकार्य आहे,त्यांच्या मार्गदर्शनाने,संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविले जात आहेत.या पुढे जाऊन यावर्षी 31 मार्चला झालेल्या जत्रेत विद्यार्थ्यांनी इडली,चहा या खाद्यपदार्थांच्या स्टॉल सुरु केला.

स्वतः विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्व व्यवहार पहात होते. व्यवहारज्ञान विद्यार्थी स्वतः अनुभवत होते. विशेष म्हणजे पार्सल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या विद्यार्थ्यांनी कागदाच्या बनविल्या होत्या तसेच चहाचे कपदेखील कागदिच वापरले होते.त्यामुळे प्लास्टिक मुक्तीचा संदेश देखील या जत्रेतून दिला गेला. या उपक्रमात आठवी व नववीतील 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या करिता मुख्याध्यापक वसंत सुळ, शिक्षक राजन कुर्डूनकर, गंगाधर साळवी, समीर गोगावले, सोनाली पंदिरकर, अंकित पंदिरकर, रुपेश धामणस्कर, श्याम गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष महादेव कुर्डूनकर,कार्यवाह अनंत रेवाळे, सदस्य प्रभाकर सागवेकर, माजी विद्यार्थी दीपक कुर्डूनकर, किशोर विचारे, राजन धाडवे, सदानंद वाळंज यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. वलंगच्या जत्रेत एक खास निराळा आणि स्तुत्य उपक्रम म्हणून सर्वांनीच शाळा,संस्था आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com