लाॅकडाऊनमध्येही त्याने कमविले हजारो रूपये 

success farming story in lock down duration at ratnagiri
success farming story in lock down duration at ratnagiri

राजापूर - तालुक्यातील गोवळ येथील विनायक शेवडे या कॉलेज युवकाने लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या शेतात भाजी पिकवत स्वयंरोजगार निर्माण केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बारावीची परीक्षा दिलेल्या विनायक याने लॉकडाऊन काळात भाजीविक्रीद्वारे हजारो रुपयांची उलाढाल केली. 
गोवळ येथील प्रगतशील शेतकरी अनिल शेवडे यांचा विनायक हा मुलगा आहे.

 शेती हाच उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत मानणारे शेवडे शेतामध्ये सतत नवनवीन प्रयोग करताना दिसतात. पावसाळ्यामध्ये भातशेती तर, उन्हाळ्यामध्ये वांगी, मिरची, भेंडी, पालेभाजी आदी विविध प्रकारची भाजी गेल्या कित्येक वर्षापासून ते करतात. शेतामध्ये तयार होणारी भाजी तालुक्यातील विविध गावांमध्ये भरणार्‍या आठवडा बाजारांसह लांजा तालुक्यात नेऊन विकतात. त्यामुळे शेती करण्यासह विक्रीचे बाळकडू विनायकला आई-वडिलांकडून घरातूनच मिळाले. कॉलेजमध्ये शिकत असताना वेळ आणि संधी मिळेल त्यावेळी तो भाजी विक्रीसाठी वडिलांना मदत करतो. 

तालुक्यामध्ये विक्रीसाठी येणारी भाजी कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातून सर्रासपणे येते. त्यांचा दरही कमी असतो. त्यांच्याशी स्पर्धा करून बाजारपेठेमध्ये टिकून राहत भाजी विक्री करणे स्थानिक व्यापार्‍यांना अवघड जाते. रात्रीच्यावेळी वडिलांच्या जोडीने शेताला पाणी देणारा विनायक राजापूर बाजारपेठेमध्ये रस्त्यानजीकच्या मोकळ्या जागेमध्ये दिवसभर भाजी विकतो. शिवाय दोन-चार दिवसांआडून जैतापूर, देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, सोलगाव आदी भागामध्ये जावून विकतो. लॉकडाऊनचा त्यांनाही फटका बसला. तरीसुद्धा गेल्या महिनाभराच्या काळात तीस-पस्तीस हजार रुपयांची उलाढाल केल्याची माहिती त्याने दिली. यामध्ये वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे लाभल्याचे विनायक सांगतो.


व्हॉट्सअपचा उपयोग 

अनेक वर्ष भाजीविक्री करणारे वडील अनिल शेवडे यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली विश्‍वासार्हता विनायकने पुढे जोपासला आहे. ज्या प्रकारची भाजी ज्या दिवशी हवी आहे. त्याबाबतचा मेसेज लोक विनायकच्या व्हॉट्स अ‍ॅप नंबरवर पाठवितात. त्याप्रमाणे विनायक त्यांना घरपोच सेवा देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com