पोलिस अधीक्षकांनी मानले आभार का वाचा

राजेश शेळके
Wednesday, 2 September 2020

नियम, अटी पाळल्यानेच कोरोना रोखण्यात यश

डॉ. मुंढे; गणेशोत्सव, मोहरममध्ये नागरिकांचे चांगले सहकार्य

रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण शासनाच्या निर्णयानुसार आणि पोलिस, प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून साजरे केले. त्यामुळे कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यात निश्‍चित आपण यशस्वी ठरलो . जिल्ह्यातील नागरिक कायद्याचे पालन करणारे ही ओळख आपण कायम ठेवल्याबद्दल मी जिल्हावासीयांचा आभारी आहे,  असे जणू ऋणनिर्देश करणारे उद्गार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.

अनंत चतुर्दशीनिमित्त काल जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशाचे विसर्जन झाले. पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुका गुलालाची उधळण, ढोल ताशाविना शांततेत निघाल्या. कोरोना संसर्गाच्या भीतीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात काल सुमारे 36 हजार 720 घरगुती तर 48 सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी मिरवणुक किंवा विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली होती. विसर्जन ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून वारंवार गर्दी करणार्‍यांना हटकून गर्दी पांगवली जात होती.

हेही वाचा- कोल्हापूरतील सर्व नाके हटवले पण गाव-प्रभाग समितीवर असणार ही महत्वाची जबाबदारी

विसर्जनासाठी मोजक्याच लोकांना समुद्रावर सोडण्यात येत होते. ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यामुळे गर्दी टाळून संसर्ग रोखण्यास पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला चांगले यश आले.यावर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणाले, जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासनातर्फे मनापासून आभार मानतो. गणेशोत्सव आणि मोहरम मार्गदर्शन सूचनांचे पालन करून साजरे करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यावर लगाम बसला. जिल्हावासीयांचे मी मनापासून आभार मानतो.

हेही वाचा- महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; या गावात कधीच विकला जात नाही चहा

* जिल्ह्यात एका दिवसात 125 बाधित
* एकूण कोरोना बाधितांची संख्या 4057
* कोरोनावर मात केलेले रुग्ण 2700
* मृत्यू 137
* उपचाराखाली 1227

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in preventing corona only by following the rules and conditions