कोल्हापूरतील सर्व नाके हटवले पण गाव-प्रभाग समितीवर असणार ही महत्वाची जबाबदारी

Collector Daulat Desai No need for e-pass but New responsibility on village ward committee
Collector Daulat Desai No need for e-pass but New responsibility on village ward committee
Updated on

कोल्हापूर : राज्य शासनाने राज्यातील ई-पास रद्द केले आहेत. यापार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द केले आहेत. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट नाके हटवले आहेत. पण, बाहेरून येणाऱ्यांची तपासणी, त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ग्राम समिती व प्रभाग समितीची असणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. आजपासून याची अमलबजावणी सुरु झाली आहे. 


जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,

जिल्ह्यात आंतरराज्य व आंतरजिल्हा हद्दीतील प्रवेश करणाऱ्या नागरिकांची परवाना तपासणी (ई-पास) व आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेले चेक पोस्ट नाके बंद करावेत. आजपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील प्रभाग समित्यांची जबाबदारी वाढली आहे. बाहेरू येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करणे याशिवाय संबंधीतांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिनी तपासणी करुन घ्यावी लागणार आहे, असे  देसाई यांनी सांगितले.  जी व्यक्ति तपासणी करुन घेणार नाही किंवा क्वारंटाईन होणार नाही, अशा व्यक्तिवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. 

 बाहेरून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी नियम व अटी : 


- जिल्ह्याबाहेरून व इतर राज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे 
- कोरोना सदृष्य ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांची कोरोना कक्षात तपासणी करून घेणे 
- तपासणी अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांना होम क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन कक्षात अलगीकरण करावे 
- कोरोना पाझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तिवर कोरोना कक्षात दाखल करा 
- पाझिटिव्ह व्यक्तिच्या कुटूंबियांची तपासणी करावी 
- कुटूंबियांना होम क्वारंटाईन करावे 
- बाहेरून आलेल्या पण पाझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तिची कुटूंबियांच्या संपर्कातील लोकांची तपासणी व अलगीकरण करावे 
- वाहनचालक व वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे 
- वाहतूक करणाऱ्यांना अलगीकरणाची व्यवस्था करावी  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri Elephant Return Kolhapur vantara team
Kolhapur Irrigation Department farmers news
Kolhapur football fans FIFA World Cup celebration
Kasba Beed gold coin discovery
Marathi News Esakal
www.esakal.com