काष्ठशिल्पातून शोधला व्यवसायाचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

राजापूर - तालुक्‍यातील गोठणेदोनिवडे येथील निकेश प्रकाश पांचाळ या तरुणाने पदवी शिक्षण घेत असतानाच व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहिले. स्वतःचा काष्ठशिल्पाचा व्यवसाय सुरू केला. केवळ निरीक्षणातून लाकडी टाकाऊ वस्तूपासून विविध प्रकारच्या आकर्षक टिकाऊ वस्तू बनवित युवा पिढीसमोर आदर्श ठेवला.  

राजापूर - तालुक्‍यातील गोठणेदोनिवडे येथील निकेश प्रकाश पांचाळ या तरुणाने पदवी शिक्षण घेत असतानाच व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहिले. स्वतःचा काष्ठशिल्पाचा व्यवसाय सुरू केला. केवळ निरीक्षणातून लाकडी टाकाऊ वस्तूपासून विविध प्रकारच्या आकर्षक टिकाऊ वस्तू बनवित युवा पिढीसमोर आदर्श ठेवला.  

वडील प्रकाश सुतारकाम करीत असल्याने घरातूनच वारसा मिळाला. त्यातून लाकडावरील कोरीव कामाची बिजे रुजली. पदवी शिक्षणावेळी महेश पांचाळ यांच्या कारखान्यामध्ये आवड म्हणून लाकडावरील कोरीव कामे करीत असताना हाच व्यवसाय करण्याचा निर्णय निकेशने घेतला. नोकरीसाठी मुंबई गाठली. मन न रुजलेल्या निकेशने पुन्हा गाव गाठले. भाड्याच्या जागेमध्ये राजापुरात काष्ठशिल्पाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी वडील, भाऊ नीलेश, आतेभाऊ जगदीश पांचाळ यांच्यासह अनिल कुशे, राजापूर कुणबी पतपेढीचे संचालक प्रकाश कातकर, दीनानाथ कोळवणकर, सुबोध कोळेकर, दीपक पुजारी, वैभव तोरस्कर आदींनी मोलाची साथ दिल्याचे निकेश सांगतो. भविष्यामध्ये लाकडी वस्तू बनविण्याचा कारखाना उभारण्याचा मानस ठेवला. 

फायबरच्या वस्तूंना पर्याय

प्लास्टिकच्या वस्तूंना अधिक पसंती मिळते. प्लास्टिकवर बंदी आली आहे. अशा स्थितीमध्ये निकेशने लाकडी वस्तूंचा पर्याय दिला आहे. वाढदिवसाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू, फ्रेण्डना भेट द्यावयाच्या वस्तू, की चेन, लाकडी खेळणी, दरवाजांवरील नावाच्या पाट्या, लग्नामधील रुखवातीमधील विविधांगी छोट्या-छोट्या वस्तू, एक अक्षरी, पूर्ण अक्षरी नाव, छोटी मंदिरे, आकर्षक ट्रॉफी आदी वस्तू निकेश बनवितो. 

एसटीची लाकडी प्रतिकृती
निकेशचे काम पाहून अक्षय मांडवकर या मित्राने त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून एसटीची लाकडी प्रतिकृती तयार करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे फणशी लाकडाच्या साह्याने निकेशने अठरा बाय पाच इंचाची हुबेहूब एसटीची प्रतिकृती बनविली. त्यासाठी सुबोध कोळेकर यांनी मदत केली. आमदार हुस्नबानू खलिफेंनी त्याचा सत्कार केला.  

Web Title: success story of Nikesh panchal