...आम्ही राजे परंपरेचे, तर तुम्ही ज्ञानाचे 

Sudambaba Sankpal Tells Shahu Maharaj Dr Ambedkar Memory
Sudambaba Sankpal Tells Shahu Maharaj Dr Ambedkar Memory

मंडणगड ( रत्नागिरी ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील झाल्यावर मुंबईतील परेल येथील बीआयटी चाळीतील दोन इमारतींच्यामध्ये पत्र्याची शेड उभारून आपले कार्यालय सुरू केले होते. याची माहिती मिळताच राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर येथून त्यांना भेटण्यासाठी आले असता आंबेडकरांनी, राजे आपण कशाला आलात? कळविले असते तर आम्हीच आलो असतो भेटायला, असे म्हटले. त्यावेळी आम्ही परंपरेचे राजे असलो तरी आपण ज्ञानाचे राजे आहात, अशा शब्दांत शाहू महाराजांनी बाबासाहेबाविषयी गौरवोद्गार काढले. 

आंबडवेचे ज्येष्ठ ग्रामस्थ व बाबासाहेबांच्या विचारांचे गाढे अभ्यासक सुदाम सकपाळ यांनी "सकाळ'शी बोलताना बाबासाहेबांच्या आठवणी महानिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जागवल्या. आंबडवे येथे देशभरातून नागरिक, अनुयायी नतमस्तक होण्यासाठी येतात. त्यांना सुदाम सकपाळ हे परिसराची माहिती देतात. आंबेडकरांच्या बालपणातील आंबडवे गावाशी संबंधित आठवणी तसेच जीवनातील संघर्ष यावर प्रकाश टाकतात. चिपळूण येथील हत्तीचा माळ येथे शेतकऱ्यांची सभा घेऊन कोकणात खोती विरोधातील लढा उभारून यशस्वी करून दाखवला. त्यासंदर्भात आंबडवे येथून पाच लोक मुंबईत बाबासाहेबांना भेटायला गेल्याची आठवणही सकपाळ यांनी सांगितली. त्यात सीताराम आंबेडकर, गणू आंबेडकर यांचा समावेश होता. 


राजर्षी शाहू महाराजांचा तो शब्दही खरा... 

1920 ला शाहू महाराजांनी हातकणंगले तालुक्यातील येथील माणगाव येथे बाबासाहेबांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी सांगितले, आंबेडकर हे भविष्यात भारताचे नेतृत्व करतील आणि तो शब्दही खरा ठरल्याचे सुदाम सकपाळ यांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com