Raigad Leopard : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; नागशेत व कोशिंबळे परिसरात तीन पाळीव जनावरांचा बळी!

Wildlife Threat : सुधागड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने नागशेत व कोशिंबळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित पंचनामा करीत शेतकऱ्यांना भरपाईसाठी मार्गदर्शन दिले आहे.
Forest department officials inspect the site in Nagashet and Koshimbale regarding Leopard Attacks

Forest department officials inspect the site in Nagashet and Koshimbale regarding Leopard Attacks

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यात नागशेत व कोशिंबळे परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केली आहे. दाट जंगलाला लागून असलेल्या या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत बिबट्याने तिन जनावरांची हत्या केली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून शेतकरी, ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलांचेही जीव या हल्ल्यांत गेले आहेत. दरम्यान, कोकणातही बिबट्याचे संचार वाढत आहे. सुधागड तालुक्यात सुद्धा अशाप्रकारे बिबटयांची दहशत वाढत असल्याने परिसरात घाबराट पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com