

Protesters demanded action over alleged irregularities in the education system and an impartial inquiry into the alleged police action against student protesters.
Sakal
पाली : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला गुरुवारी (ता. 23) सुधागड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुधागड तालुक्यातील पाली, परळी आणि पेडली या प्रमुख बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवून व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शवला. हा बंद अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.