

Illegal Construction and Excavation in Sudhagad Riverbed Trigger Anger Among Villagers Ahead of the Upcoming Monsoon Season
esakal
पाली: सुधागड तालुक्यातील आरडेचीवाडी (हेदवली), कानसळ आणि दहिगाव परिसरातील नदीपात्रात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणावर होणारे उत्खनन आणि नदीपात्रालगत उभारण्यात येणाऱ्या वॉल कंपाउंडमुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. 5) सुधागड तहसीलदारांना निवेदन देऊन पाटबंधारे विभागालाही पत्रव्यवहार केला आहे.