सुधागडच्या शाश्वत व सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबध्द राहणार - आ. अनिकेत तटकरे

अमित गवळे
रविवार, 27 मे 2018

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत आमदार अनिकेत तटकरे यांनी शनिवारी (ता.२६) पाली दौरा केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी सुधागड तालुक्याच्या शाश्वत व सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. 

पाली (रायगड) - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत आमदार अनिकेत तटकरे यांनी शनिवारी (ता.२६) पाली दौरा केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी सुधागड तालुक्याच्या शाश्वत व सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. 

आ. अनिकेत तटकरे यावेळी म्हणाले की तटकरे व ओसवाल कुटुंबियांनी मागील ३५ वर्षापासून ऋणाणुबंध व जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विकासात्मक व संघटनात्मक जडणघडणीत तटकरे व ओसवाल कुटुंबियांचे महत्वपुर्ण योगदान राहिले आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्यात आमदार झालो याचे अधिक समाधान वाटत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, पाली सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ग.रा. म्हात्रे, प्रकाश कारखानिस, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, पाली शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, सखाराम दिघे, सुलतान बेणसेकर, दिपक पवार, सुनिल राउत, ललित ठोंबरे आदींसह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. 

संपुर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासकामांचा आलेख उंचावत आहे. सुधागड तालुक्याला देखील राष्ट्रवादीने विकासकामात नेहमीच झुकते माप दिले आहे. सुधागड तालुक्याच्या शाश्वत व सर्वांगिण विकासासाठी यापुढेही कटिबध्द राहणार आहे असे मत यावेळी विधानपरिषदेचे नवनिर्वाचीत आ. अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Sudhagad will remain firmly committed to sustainable and sustainable development says aniket tatkare