सुधागड मनसेच्या वतीने आदिवासीचे तोंड गोड

अमित गवळे
बुधवार, 20 जून 2018

आदिवासी बांधवांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मनसे प्रयत्नशिल आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांशी हितगुज करुन त्यांना भेडसावणारे प्रश्न व अडचणी जाणून घेता आल्या.

पाली - सुधागड तालुका मनसेच्या वतीने सुधागड तालुक्यातील दांडवाडी आदिवासीवाडीवर साखर वाटप करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनिल साठे म्हणाले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी बांधवांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मनसे प्रयत्नशिल आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांशी हितगुज करुन त्यांना भेडसावणारे प्रश्न व अडचणी जाणून घेता आल्या. येत्या काळात आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण उत्कर्षासाठी मनसे काम करेल असे साठे यांनी सांगितले. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आदिवासी लाभार्थी समाजघटकापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक उपक्रम राबविले जातील असे सचिन झुंजारराव यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल साठे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सुधागड तालुका अध्यक्ष सचिन झुंजारराव, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष राजेश खरिवले व प्रशांत पडवळ आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.दांडकातकरवाडीतील आदिवासी बांधवांनी मनसे पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Sugar was distributed on by MNS at Sudhagad