प्रेमाच्या त्रिकोणातून "त्या' तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रत्नागिरी - शहराजवळील एसटी कॉलनी येथे सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रेमाच्या त्रिकोणाच्या नैराश्‍यातून त्या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरील अक्षरही त्याचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. 

श्रीकांत संभाजी फुले (वय 28, रा. लातूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. गेल्या शुक्रवारी टीआरपी येथील एका झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. तो काही दिवसांपूर्वीचा असल्याने सडण्यास सुरवात झाली होती. ग्रामीण पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला गेला. मृताच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडली. ""माझे तिच्यावर प्रेम आहे. मला का फसवलेस, पैशासाठी की अन्य कशासाठी, मला मारणारी तीच आहे,'' असा मजकूर त्यामध्ये होता. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शिरगाव-शेट्येवाडीचा त्यामध्ये पत्ता होता. यावरून पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या नावाचे कोणीच आढळून आले नाही. 

श्रीकांत फुले सेंट्रिंगची कामे करीत होता. तो प्रेमात पडला; मात्र त्याच्या प्रेयसीचे अन्य एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. तिने श्रीकांतकडे दुर्लक्ष केले. त्याला ती जराही जुमानत नव्हती. याचा मोठा धक्का त्याला बसला. यातून त्याने विषारी द्रव घेऊन आत्महत्या केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. 

Web Title: suicide case in ratnagiri