सावंतवाडीत विष पिऊन तरुणीची आत्महत्या

सावंतवाडीत विष पिऊन तरुणीची आत्महत्या

सावंतवाडी - गवळीनाका येथील एका कॉम्प्लेक्‍समध्ये खासगी संस्थेत शिकविणाऱ्या निकिता सोमू चव्हाण (वय २१) या तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, मात्र या आत्महत्येला वेगळेच वळण लागले आहे. तिच्या भावाने ज्या संस्थेत आपली बहीण काम करीत होती, त्या संस्थेतील शिक्षकाने तिला विष पाजून मारल्याचा आरोप केला आहे. ही घटना १२ नोव्हेंबरला घडली होती.

याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस ठाण्यात देऊन चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गवळीनाका येथील कॉम्प्लेक्‍समध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकविणाऱ्या एका संस्थेत निकिता चव्हाण कामाला होती. त्या संस्थेच्या शिक्षकाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. १२ नोव्हेंबरला तिने विष पिले, त्यादिवशी ती त्या संस्थेत होती. त्या शिक्षकाने तिला रुग्णालयात दाखल केले. नंतर तिचा गोवा बांबोळी येथे मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी १३ नोव्हेंबरला सायंकाळी मृतदेह माजगाव येथे आणण्यात आला. व १४ नोव्हेंबरला अंत्यसंस्कार झाले. तिच्या मृत्यूबाबत तिच्या भावाने तिच्यासोबत असलेल्या शिक्षकाला जबाबदार धरले आहे. प्रेमसंबंधातून आपल्या बहिणीचा घातपात झाल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे निवेदन आज शिवसेना, भाजपतर्फे माजगावचे सरपंच दिनेश सावंत, तालुकाप्रमुख महेश सारंग, माजी आमदार राजन तेली, विक्रांत सावंत यांनी देऊन चौकशीची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com