चंपक मैदानात चालतोय अंधश्रद्धेचा खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

रत्नागिर - कोंबड्याच्या गळ्यातून आरपार खिळा ठोकून झाडाला लटकवलेला, खाली लिंबू, नारळ आदी मनात धस्स करणारे चित्र शहराजवळील चंपक मैदानातील आहे. एका महिलेसह आठ पुरुषांचा यामध्ये समावेश आहे. निर्जन ठिकाणी असे प्रकार अंधश्रद्धेला निमंत्रण देणारे आहेत. या मानसिकतेतून एखादा नरबळी जाण्याची भीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शहराला लागून असणाऱ्या उद्यमनगर भागातील चंपक मैदानात कथित जादूटोण्याचा हा प्रकार घडला आहे. दिल्ली बुराडी येथे एकाच कुटुंबातील ११ जणांनी अशाच अंधश्रद्धेतून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. अंधश्रद्धेतून नरबळी दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आवर घातला पाहिजे, असे समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.  

चंपक मैदान परिसरात रविवारी सायंकाळी आठ ते दहा माणसांच्या संशयास्पद हालचाली एका व्यक्तीला दिसल्या. त्यामध्ये एका महिलेचा समावेश होता. हे सर्व तेथील झुडुपात गेली. अर्ध्या तासाने तेथून निघून गेले. हे सर्व दुरून पाहणाऱ्या व्यक्तीने  झुडुपात जाऊन पाहिले असता भयानक चित्र या व्यक्तीला दिसले. या व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलावून हा प्रकार दाखवला. कोंबड्याच्या गळ्यातून आरपार खिळा ठोकून झाडाला लटकवला होता. या खाली लिंबू, नारळ, पानाचा विडा, आदी वस्तू होत्या. जादूटोणाचा हा भयवाह प्रकार पाहून काहींच्या मनात धडकी भरली. 

चंपक मैदान परिसरातील हा प्रकार भगतगिरीचा आहे. त्याला वेळीच ठेचला पाहिजे; अन्यथा त्यातून नरबळीचा प्रकार घडू शकतो. आम्ही या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहे. 
-विनोद वायंगणकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकारी

Web Title: Superstition in ratnagiri