नाणार प्रकल्पाबाबत सुरेश प्रभूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी - परुळेकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सावंतवाडी - शिवसेनेत असताना संपूर्ण कोकण इकोसेनन्सेटिव्ह व्हावे अशी मागणी करणार्‍या केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आता नाणार बाबत आपली भूमिका जाहीर करावी. तसेच वेळ पडल्यास आपल्या केद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोकणीपणाचा बाणा दाखवून द्यावा असे आव्हान जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेद्र परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले

सावंतवाडी - शिवसेनेत असताना संपूर्ण कोकण इकोसेनन्सेटिव्ह व्हावे अशी मागणी करणार्‍या केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आता नाणार बाबत आपली भूमिका जाहीर करावी. तसेच वेळ पडल्यास आपल्या केद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोकणीपणाचा बाणा दाखवून द्यावा असे आव्हान जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेद्र परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले

नाणार येथे होणारा रिफायनरी प्रकल्प हा भविष्यात धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आणखी काही दिवसांनी या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प हवा की नको याबाबत जनमत चाचणी घ्यावी असे परुळेकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष रविद्र म्हापसेकर, आनंद राउळ आदी उपस्थित होते. 

यावेळी परूळेकर म्हणाले तब्बल चार वेळा कोकणी जनतेने प्रभू यांना खासदार म्हणून निवडून दिले आहे. सन 2009 निवडणूकीच्या काळात प्रभू यांनी कोकण हा प्रदेश पर्यटनदृष्टया विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे याठिकाणी इकोसेन्सटिव्ह लागणे गरजेचे आहे. असे वारंवार बोलून दाखविले होते. मात्र आज या ठिकाणी नाणार सारखा प्रदुषणकारी प्रकल्प येत आहे. याचा फटका जिल्ह्यातील लोकांना सहन करावा लागणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी सिधुदूर्ग आणी रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील लोकांकडुन होत आहे. त्यामुळे याचा विचार लक्षात घेता हा प्रकल्प रद्द होण्यासाठी प्रभू यांनी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

श्री परुळेकर पुढे म्हणाले प्रभू यांनी अनेक वेळा कोकणी माणसाने आपल्याला जन्म दिला असे बोलून दाखविले आहे त्यामुळे आता प्रदुषणकारी ठरणारा हा प्रकल्प रद्द होण्यासाठी श्री प्रभू यांनी आपल्या केद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देवून आपला कोकणी बाणा दाखवून द्यावा
तर दुसरीकडे अशा प्रकारचा प्रकल्प या भागासाठी फायदेशीर आहे का नाही याबाबत लोक प्रतिनिधींनी निर्णय न घेता दोन्ही जिल्ह्यातील लोकांची जनमत चाचणी घ्यावी आणी त्यानंतर हा प्रकल्प करण्याबाबत पाउले उचलण्यात यावीत असे परुळेकर म्हणाले यावेळी परुळेकर यांनी फडणवीस यांच्यावर टिका केली नाणार प्रकल्प यशस्वी होण्यावरच आता मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राहणार की जाणार हे ठरणार आहे त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मुख्यमंत्री आणी भाजपाचे लोक कोणतीही भूमिका घेण्यास तयार असतील अशी टिका परुळेकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Prabhu should explain his role on nenar project