ती नौका नौदलाची - तटरक्षक दल

अच्युत पाटील
बुधवार, 24 जानेवारी 2018

बुधवारी सकाळी सात वाजता च्या सुमारास मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दोन बोटी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सचिन पाणकर, डहाणू पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे घटनास्थळी पोचले

बोर्डी -  झाई बंदराच्या समुद्रात संशायस्पदरित्या फिरत असलेल्या नौका नौदलाच्या असल्याचे कोस्टगार्डचे कमांडर रत्नपारखी यांनी स्पष्ट केले.
 

बुधवारी सकाळी सात वाजता च्या सुमारास मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दोन बोटी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या होत्या. 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सचिन पाणकर, डहाणू पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे घटनास्थळी पोचले .तत्पूर्वी घोलवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी स्थानिक मच्छीमार राजू दमणकर यांचे मदतीने जीवाची पर्वा न करता समुद्रात गेले. सुमारे दोन तास प्रयत्न करून नौका ताब्यात घेऊन चोकशी केली असता, सदर नौका नौदलाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: suspicious boat coast guard konkan