सावंतवाडीत संशयास्पद डास

सावंतवाडीत संशयास्पद डास

सावंतवाडी - येथील शासकीय पर्णकुटी विश्रामगृहावर चिकनगुन्या सदृश्‍य डास आढळले आहेत. हा प्रकार मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासमोर उघड झाला.

या प्रकाराबाबत त्यांनी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. रोगराई पसरु नये, यासाठी आवश्‍यक ती काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

येथील सालईवाडा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह आहे. त्याठिकाणी अनेक नेते येत जात असतात; मात्र गेले काही दिवस हे विश्रामगृहात योग्य प्रकार साफसफाई केली जात नाही. त्यामुळे याठिकाणी ते चर्चेत आले होते. काल (ता.११) याठिकाणी श्री. उपरकर हे पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी व्हीआयपी सुटमध्ये मोठ मोठे डास असल्याचे त्यांना दिसले. यावेळी खात्री केली असता हे डास चिकनगुन्या सारखा तापाचा आजार उत्पन्न करणारे असल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. 

पालिका आणि बांधकाम विभागाने अशा प्रकारचे डास त्याठिकाणी निर्माण होवू नये, यासाठी आवश्‍यक ती फवारणी करावी, अशी मागणी केली आहे.

फवारणीच्या सूचना देऊ
याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिली असता तात्काळ त्याठिकाणी फवारणी केली जाईल, असे सांगितले. आवश्‍यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकामला केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com