रत्नागिरी जि. प. स्थायी समितीवर स्वरुपा साळवी, संतोष थेराडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवड झाल्यानंतर रिक्‍त झालेल्या विषय समिती सदस्य पदांची निवडणूक शुक्रवारी (ता. 14) झाली. सकाळी 11 वाजता इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

रत्नागिरी - जिल्हा परिषद विषय समितींवरील 19 सदस्य पदांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये स्थायी समितीवर माजी अध्यक्षा स्वरुपा साळवी आणि संगमेश्‍वरचे संतोष थेराडे यांची निवड झाली आहे. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवड झाल्यानंतर रिक्‍त झालेल्या विषय समिती सदस्य पदांची निवडणूक शुक्रवारी (ता. 14) झाली. सकाळी 11 वाजता इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीसाठी एकच सदस्याने अर्ज केला होता. जिल्हा परिषदेत 55 पैकी राष्ट्रवादीचे 15 सदस्य असले तरीही महाविकास आघाडीमुळे निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. दुपारी 2 वाजता निवडीची सभा सुरू झाली.

आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची नावे सभागृहात वाचून दाखवली. अध्यक्ष रोहन बने यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ आणि माजी अध्यक्षा साळवी यांचे नाव निश्‍चित होते. दुसऱ्या नावासाठी चर्चा सुरू होती. त्यात संतोष थेराडे यांचे नाव आघाडीवर होते. गेले अनेक दिवस विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे मुद्दे मांडत असल्यामुळे त्यांचा नंबर लागेल असा अंदाज होता. त्यानुसार थेराडे यांना स्थायी समितीवर घेण्यात आले. 

विषय समित्यांमध्ये हे सदस्य 

विषय समितीच्या 19 सदस्यांमध्ये स्नेहा सावंत (जलव्यवस्थापन), नफीसा परकार, प्राजक्‍ता पाटील, विशाखा लाड, सुजित महाडिक, विजय कदम (सर्व कृषी समिती सदस्य), प्रणाली चिले, लिला घडशी, विभावरी मुळे, रऊफ अब्बास हजवानी (सर्व पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती), रवींद्र शिंदे (महिला व बालकल्याण), शंकर भुवड (वित्त समिती), विनोद झगडे (समाजकल्याण), प्रकाश रसाळ (बांधकाम), नेत्रा ठाकूर, साधना साळवी (शिक्षण व क्रीडा समिती), संतोष गोवळे (आरोग्य समिती) यांचा समावेश आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swaroop Salavi Santosh Therade On Ratnagiri Zilla Parishad Standing Committee