ताडगाव - मोफत आरोग्य शिबिरात गरिब व आदिवासी नागरीकांनी घेतला लाभ

अमित गवळे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबीर संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सर्वसामान्य ग्रामस्थ, गरिब व आदिवासी बांधवांनी लाभ घेतला.

पाली - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे गुड डुअर्स चैरिटीज मुंबई, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबीर संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सर्वसामान्य ग्रामस्थ, गरिब व आदिवासी बांधवांनी लाभ घेतला.

ताडगावमधील हे तिसरे आरोग्य शिबीर असुन प्रत्येक महिन्याला अशा स्वरुपाचे आरोग्य शिबीर आयोजित केले जात आहे. गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई यांच्या माध्यमातून डॉ. आत्मन दफ्तरी आणि डॉ. अमर कारिया यांनी आरोग्य शिबीरासाठी नि:स्वार्थपणे मदत केली. तसेच  प्रा.उमेश सिंग, नीता सिंग, नितीश, शिवानी, राजेश, सुरज, कृष्णा, सुभाष, तन्वी, प्रा. मनिषा, प्रा. बजाज आणि सीमा यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी आपले योगदान दिले. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे श्री माथेव यांना आमंत्रित केले होते. त्यांनी शिबिराची पाहणी करून यापुढे शिबिरासाठी नक्की योगदान देऊ असे आश्वासन दिले. ताडगांव, खेमवाडी, दुधणी, कोटबेवाडी (टिकेडीके) परिसर विकास संघर्ष समितीचे सदस्य आणि युवा मित्र मंडळ ताडगांवचे अध्यक्ष राकेश साठे, ताडगांव उपसरपंच महेश देशमुख, मंगेश देशमुख. केतन साठे, निलेश साठे, नरेश देशमुख, समीर साठे, रोशन साठे, वैभव साठे यांनी शिबिरासाठी मेहनत घेवून शिबीर यशस्वीरित्या पार पडले.

शिबीरामध्ये मोतीबिंदू ,व्हिटॅमिन डी ३ कमतरता आणि सांधे दुखी हे आजार अधिक लोकांमध्ये आढळले. पुढिल चौथ्या शिबिराचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगांव येथे घेण्यात येणार आहे.

सर्वांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबीर चांगल्या प्रकारे पार पडले. शिबीराचा अनेक गरजू व गरिब रुग्नांना फायदा झाला आहे. पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या शिबीराचा देखिल अधिक लोकांनी लाभ घ्यावा. 
सचिन साठे, सचिव, टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती

Web Title: Tadgaon - Benefits of the poor and Tribal citizens took place in the Free Health Camp