आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका बॅलेटपेपर वर घ्या - भारिप बहुजन महासंघाची मागणी

अमित गवळे
मंगळवार, 12 मार्च 2019

पाली - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका या इ.व्हि.एम. मशिनचा वापर न करता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कमिटिच्या आदेशानुसार सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना या संदर्भातील निवेदन दिले.   

हे निवेदन पाली तहसिलदार यांच्या वतीने महसुल नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी स्विकारले. इ.व्हि.एम. मशिनच्या संदर्भात अनेक राजकीय पक्ष, नेते व सामाजीक संघटनांनी संशय व्यक्त करून अक्षेप घेतला आहे. त्यांनी इ.व्हि.एम. मशिनचा दुरुपयोग होत असल्याचे म्हटले आहे.  याच पार्श्वभुमीवर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात मुख्यनिवडणुक आयुक्ताना लेखी निवेदन देवुन पुन्हा बॅलटपेपरचा वापर करण्याची मागणी केली आहे.

हे निवेदन देतेवेळी भारिप बहुजन महासंघाचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, सरचिटणिस आंनद जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, सचिव तुषार शिर्के, सखाराम घोघरकर, विजय हिलम, वामन चव्हाण, सुरेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बॅलेट पेपरवर निवडणूक ही अधिक पारदर्शक आहे. ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे. त्यामुळेच आमचा ईव्हीएम मशिनला विरोध आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सकाळला सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take the upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections on a ballot paper - the demand for Bharipal Bahujan Mahasangh