सिंधुदुर्गात दिव्यांगाकडून लाच घेणारा समाज कल्याण सहाय्यक जाळ्यात 

सिंधुदुर्गात दिव्यांगाकडून लाच घेणारा समाज कल्याण सहाय्यक जाळ्यात 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) :  जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा वरिष्ठ सहायक विद्याधर राजाराम पवार (वय 52) याला दिव्यांग व्यक्तीकडून अडीच हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज पकडले. जिल्हा परिषद आवारातच दुपारी दीडच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. 

शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना कार्यान्वीत आहेत. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनता यावे, स्वरोजगारातून आर्थिकदृष्टया उभे राहता यावे, यासाठी मदत करणारी योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविली जाते. याच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एका दिव्यांग व्यक्तीने स्वयंरोजगारसाठी 25 हजार रुपयांचे बीज भांडवल मिळावे, यासाठी अर्ज केला होता .

अर्ज मंजूरीसाढी अडीज हजार रुपयांची लाच

 हा  अर्ज मंजूर करण्यासाठी पवार याने अडीज हजार रुपयांची लाच मागितली होती. एवढी रक्कम देणे शक्‍य नसल्याने सबंधित दिव्यांग व्यक्ती अडचणीत आली होती. त्यामुळे त्यांनी याची तक्रार कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे 2 डिसेंबरला केली होती. 

गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई

लाचलुचपत विभागाने याचे गांभीर्य ओळखत तत्काळ कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार या विभागाने दुपारी दीडच्या दरम्यान जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर असलेल्या टपाल मध्यवर्ती कार्यालयामध्ये सापळा रचला. तेथे लाचेची रक्कम घेताना पवार याला पकडण्यात आले.

सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद हातोटे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितिन कुंभार, मितेश केणी, कॉन्स्टेबल अमित खांडे, प्रथमेश पोतनीस यांनी कारवाई केली. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 


लाच मागतली की तक्रार आमच्या कार्यालयाकडे करा

दिव्यांग व्यक्तींने 2 डिसेंबरला तक्रार केली. आम्ही लाच घेणाऱ्या व्यक्तीवर एका दिवसात कारवाई केली. तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव सुद्धा गोपनीय ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे कोण लाच मागत असली तर त्याची तक्रार आमच्या कार्यालयाकडे करावी.'
- दीपक कांबळे, उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com