esakal | तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचला; एकेरी वाहतुक सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचला

तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचला

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय (Talere Kolhapur National Highway)महामार्गावरील करूळ घाटरस्ता (karul ghat) आज ता.१२ खचला.त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे.पोलीसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेवुन तात्पुरती डागडुजी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हयात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे.काल रात्रभर जिल्हयात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्हयातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. घाट परिसरात तर अतिवृष्टी सुरू आहे. या पावसाचा सर्वाधीक फटका वैभववाडी (vaibhavwadi)तालुक्यातील करूळ घाटरस्त्याला बसला आहे.करूळ तपासणी नाक्यापासुन तीन ते चार किलोमीटर अतंरावर घाटरस्ता खचला आहे. रस्त्याचा मोठा भाग खचल्यामुळे आणखी काही भाग खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. घाटरस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतुक धोकादायक बनली आहे.(talere-Kolhapur-national-highway-karul-ghat-road-collapsed-vaibhavwadi-sindhudurg-rain-update)

दरम्यान ही माहीती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलेत.त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तत्काळ तेथुन एकेरी वाहतुक सुरू केली आहे. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावुन घेतले आहे.बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यासाठी निघाले आहेत.मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरूस्ती करणे देखील धोकादायक आहे.खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही.पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

पाण्याचा निचरा नाही

करूळ घाटरस्त्याच्या डोंगराकडील बाजुला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत.परंतु पावसाळा सुरू होण्यापुर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते.तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही.ते रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे,रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात.आता देखील तशाच प्रकारे रस्ता खचला आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; दुर्गाबाईंनी दिला निपाणकरांना शह

देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे

तळेरे-कोल्हापुर हा राष्ट्रीय महामार्ग आहे.पुर्वी हा राज्यमार्ग होता.त्यावेळी त्याची सर्व देखभाल दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असे.परंतु आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे आहे.परंतु या प्रधिकरणाचे कार्यालयात गगनबावडा किवा वैभववाडीत नसल्यामुळे तातडीची देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे.

loading image