दादर ते महाड सायकल स्पर्धेत तामिळनाडूचा व्ही. रंगराज पहिला

सुनील पाटकर
सोमवार, 28 मे 2018

महाड - कडकडीत ऊन, वाहतूक कोंडी आणि त्यातच रस्त्याची दयनीय अवस्ता यावर मात करत दादर (नायगाव) ते महाड या 166 किलो मिटर अंतराच्या राष्ट्रिय स्तरीय सायकल स्पर्धेत तामिळनाडूच्या व्ही. रंगराज यांने  2 तास 33 मिनिटा मध्ये हे अंतर कापून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

महाड - कडकडीत ऊन, वाहतूक कोंडी आणि त्यातच रस्त्याची दयनीय अवस्ता यावर मात करत दादर (नायगाव) ते महाड या 166 किलो मिटर अंतराच्या राष्ट्रिय स्तरीय सायकल स्पर्धेत तामिळनाडूच्या व्ही. रंगराज यांने  2 तास 33 मिनिटा मध्ये हे अंतर कापून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुंबई येथील राईप मँगो स्पोर्ट इव्हेंन्ट मॅनेजमेंट प्रा.लि ने ही स्पर्धा आयोजित केली होती. रविवारी सकाळी सात वाजता दादर येथून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. 125 स्पर्धकांनी भाग घेतला होता. परंतु, स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान केवळ 25 जणांनी पेलले. सकाळी साडे अकरा वाजता महाड येथे या सर्वांनी अंतिम टप्पा गाठून स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेमध्ये तामिळनाडूचा व्ही रंगराज यांने 166 किमिचे अंतर 2 तास 33 मिनिटात कापले. तर दुस-या क्रमांकाचे पारितोषिक किशोर जाधव याला देण्यांत आले. तृतिय क्रमांक मेहराज इराणी याने पटकावले. महाडच्या 55 वर्षीय कृष्णा लाड यांनीही सात तासात हे अंतर पार केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना आ.भरत गोगावले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यांत आले. 

आजच्या गतीमान युगामध्ये तरुणपिढी मैदानी खेळा कडे दुर्लक्ष करीत आहे. सायकलींग स्पर्धा ही आव्हानात्मक स्पर्धा असल्याने अश्या स्पर्धा भरविणे ही आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ.भरत गोगावले यांनी यावेळी केले.

राईप मॅगो स्पोर्ट इव्हेंट मॅनेजमेंट प्रा.लि.च्या व स्पर्धेच्या संयोजिका श्रीमती माधवी राजेंद्र कोयंडे, नॅशनल सायकलीग असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.एम.सिंग, राजेंद्र कोयंडे, जिल्हा परिषदे सदस्य संजय कचरे, मुंबई सायकल असोचे अध्यक्ष अनंत तांबे, माजी सचिव प्रताप जाधव उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यांत आले.

Web Title: Tamil Nadu's V. Rangraj first in Dadar to Mahad Cycle Championship