esakal | तौक्तेचा परिणाम: 1 हजार कोंबडी पिलांचा मृत्यू : वेंगुर्लेतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

तौक्तेचा परिणाम: 1 हजार कोंबडी पिलांचा मृत्यू

तौक्तेचा परिणाम: 1 हजार कोंबडी पिलांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग): तौक्ते चक्रीवादळाचा(tauktae cyclone) फटका येथील किनारपट्टीभागासह कुक्कुटपालन (Poultry farming)व्यवसायाला बसला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या कृष्णा राऊळ यांच्या मांगरावर आंब्याचे झाड पडून सुमारे 1000 कोंबडीची पिल्ले(Chicken chicks) मृत झाली आहेत. मांगराच्या पडझडबरोबर कोंबड्यांचे खाद्याचेही नुकसान झाले आहे. यात त्यांचे अंदाजित 3 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्‍याला तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला.(tauktae-cyclone-Vengurla-impact-1-thousands-chikens-died-kokan-news)

किनारपट्टी भागातील मच्छिमारांसह सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या चक्रिवादळात येथील राऊळवाडा येथील राऊळ यांचा कुक्कुटपालन व्यवसायाचेही नुकसान झाले. येथे राऊळ यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे.

हेही वाचा- मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची खाजगी हॉस्पीटलसमोर निदर्शने

तौक्ते चक्रीवादळात कोंबडीची पिल्ले असलेल्या मांगरावर आंब्याचे झाड पडल्याने मांगराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्या पडझडीत मांगरामध्ये असलेली सुमारे 1000 कोंबडीची पिल्ले मृत झाली. त्यांचे खाद्यही वाया गेले आहे. या सर्वात त्यांचे 3 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.