esakal | मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची खासगी हॉस्पीटलसमोर निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची खासगी हॉस्पीटलसमोर निदर्शने

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची खासगी हॉस्पीटलसमोर निदर्शने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात (maratha reservation) याचिका दाखल करणाऱ्याविरुद्ध मराठा समाज आक्रमक झाला आहे. 'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' या संस्थेचे सदस्य डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील हॉस्पिटलसमोर मराठा समाज आक्रमक झाला. आरक्षणातून झालेली भरती रद्द करण्याची मागणी या संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे (CM uddhav thackeray) केली आहे. यावेळी संतप्त मराठा समाजातील कार्यकर्त्ये घोषणा बाजी करत हॉस्पिटलमध्ये घुसल्याने पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.

'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' या संस्थेमार्फत मराठा आरक्षणा विरोधातली ही लढाई आहे. ही महाराष्ट्र पातळीवरील संघटना आहे. या संघटनेचे कोल्हापुरातील एक संचालक डॉ. तन्मय व्होरा हे आहेत. मराठा आरक्षण रद्द केल्याने संघटनेने लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा युवकांच्या नियुक्ती रद्द कराव्यात. या नियुक्ती बेकायदेशीर आहेत अशा आशयाचे पत्र दिले आहे. हे पत्र मागे घ्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: 'मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई'

यावेळी रुग्णालयातून बाहेर येण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला, परंतु डॉक्टर न आल्यामुळे कार्यकर्ते रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्ये यांच्यात झटापट झाली. मराठा कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या फलकाची तोडफोड केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर यांनी कार्यकर्त्ये उपस्थित होते. डॉक्टरांनी मराठा समाजाची माफी मागावी आणि हे पत्र मागे घ्यावे अशी मागणी करून आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांनी माफी मागावी असा आग्रह धरला. पोलिस बंदोबस्तात आंदोलकांसमोर येऊन डॉक्टर व्होरा यांनी आपण या पत्रावर सही केली नाही. तरीही या पत्रामुळे किंवा संस्थेच्या अन्य पत्रामुळे जर मराठा समाजाची भावना दुखावली असेल तर माफी मागतो आणि या संस्थेतून बाहेर पडतो असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: फेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा?