vishal khamesara
sakal
पाली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी मिळणारा कालावधी कमी पडत असल्याने देशभरातील चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कर सल्लागारांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
कर प्रणालीतील या तांत्रिक व व्यावहारिक अडचणींमुळे कामाचा दर्जा राखणे आव्हानात्मक बनले असून, करदाते आणि व्यावसायिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, तर ऑडिट केससाठीचे आयटीआर भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवून मिळावी, अशी जोरदार मागणी देशभरातून केली जात आहे.