धक्कादायक ! शिक्षिकेने आवळला विद्यार्थ्यांचा गळा​ ?

Teacher Attempt To Embrace Students Throat Sindhudurg Marathi News
Teacher Attempt To Embrace Students Throat Sindhudurg Marathi News

कडावल ( सिंधुदुर्ग ) - कडावल परिसरातील एका शाळेत विद्यार्थ्यांचा गळा आवळल्याचा आरोप असलेल्या "त्या' शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्‍वासन पंचायत समिती सभापती राजन जाधव यांनी पालकांना व ग्रामस्थांना दिले. 
कडावल परिसरातील एका शाळेत शिक्षिकेने मुलांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शनिवारी झाला होता.

याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित ग्रामस्थ आणि पालकांशी आज कडावल येथे सभापती जाधव यांनी चर्चा केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, पंचायत समिती सदस्य सौ. कल्याणकर, गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे उपस्थित होते. सभापती जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य परब यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. 
शिक्षिकेची तत्काळ चौकशी करून कारवाईच्या सूचनाही त्यांनी या वेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शाळेसाठी शिक्षक उपलब्ध होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही सभापतींनी यावेळी दिले. 

अन् आक्रमक झालेले पालक शांत

प्राथमिक शाळेतील संबंधित शिक्षिकेने तीन मुलांचा गळा दाबल्याचा आरोप झाला होता. पालकांनी त्या शिक्षिकेला त्वरित निलंबित करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन ही चर्चा करण्यात आली. संबंधित शिक्षिकेची बाजूही ऐकून घेण्यात आली. तिनेही आजारी असल्याचे सांगितले. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले. त्यानंतर दोषींवर कारवाईची ग्वाही देण्यात आली. यानंतर आक्रमक झालेले पालक शांत झाले. 

हेही वाचा - VIDEO : ट्रॅक्‍टर चालविण्यात तरबेज ‘सुधा’ 

भविष्यात काळजी घेणार ! 

भविष्यात असे प्रकार कोठेही होवू नयेत, यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन जिल्हा परिषद सदस्य परब यांनी दिले. यावेळी कडावल सरपंच स्नेहल ठाकूर, उपसरपंच विद्याधर मुंज, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू कालेकर, उपाध्यक्ष अमित कल्याणकर, सहदेव तांबे, राजेंद्र मुंज, रवींद्र सावंत, बाळकृष्ण ठाकूर, भिकाजी पालव आदी उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com