आता जिंकेपर्यंत लढायचं! ठाकरेंच्या खेडच्या सभेचा टिझर लॉन्च : Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray: आता जिंकेपर्यंत लढायचं! ठाकरेंच्या खेडच्या सभेचा टिझर लॉन्च

मुंबई : रत्नागिरीच्या खेड तालुक्यात उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या तयारीचा टिझर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लॉन्च करण्यात आला आहे. "मला अन्यायावर वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठीत वार करणारे नको" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी यामध्ये एल्गार पुकारला आहे. (Teaser launch of ShivSena Uddhav Thackeray Ratnagiri Khed Rally)

तीस सेकंदाचा हा टिझर असून यात सुरुवातीलाच छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भगवा झेंडा शनिवार वाडा अशी प्रतिकं दिसतात. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भाषण समोर येतं. यामध्ये ते म्हणतात माझी तयारी निखाऱ्यावर चालण्याची आहे, तुमची आहे का? असं ते विचारतात.

तर पुढे मला माझ्यासोबत अन्यायावर वार करणारे सैनिक पाहिजेत पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत, तुम्ही मला फक्त वज्रमुठ द्या दात पाडायचे काम मी दाखवतो, अशी ठाकरेंची डायलॉगबाजी यात दिसते.

या टिझरला ठाकरे गटानं खास टॅग लाईन देखील दिलीए. 'चलो खेड निष्ठा मातोश्रीशी ईमान भगव्याशी' अशी ही टॅग लाईन असून उद्या रविवार, ५ मार्च २०२३ ला संध्याकाळी ६ वाजता ही सभा रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गोळीबार मैदावार पार पडणार आहे.