देवगड तालुक्यात उकाड्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

देवगड - येथील उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ होत असल्याने दुपारी रस्त्यावरील वर्दळ मंदावलेली असते. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी रसवंतीगृह तसेच शीतपेयांच्या दुकानामधील नागरिकांची गर्दी वाढत आहे. जनावरेही झाडाच्या आश्रयाला तसेच पाणवठ्याच्या ठिकाणी दृष्टीस पडत आहेत. दरम्यान, अधूनमधून किनारपट्टीवर वारा सुटत आहे.

गेले काही दिवस येथील वातावरण बदलत आहे. थंडी नाहीशी होऊन गरमा जाणवू लागला आहे. कडक ऊनाचे चटके बसू लागले आहेत, तर मधूनच किनारपट्टीवर वारा सुटत असल्याने रात्री वातावरण काहीसे थंड जाणवते. उष्णतेमुळे बाहेरील गावातील मंडळी कामानिमित्त येथील बाजारपेठेत सकाळी येताना दिसतात. दुपारी रस्ते काहीसे निर्मनुष्य भासतात. वातावरणातील वाढत्या उकाड्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. त्यामुळे काही भागांत पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. शहरात नळयोजनेचे पाणी वेळीच न आल्यास टंचाईची झळ बसत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: temperature increase in devgad tahsil