कोरोना रोखण्यासाठी आम्ही सुद्धा प्रतिबद्ध आहोत म्हणत मुस्लीम बांधव सरसानले अन्...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

चिपळूणच्या मुस्लिम समाजाकडून धार्मिकतेला व्यापक रूप

कामथे उपजिल्हा रूग्णालयासाठी केले दहा लाख रुपये खर्च

चिपळूण (रत्नागिरी)  : चिपळूण तालुका मुस्लीम समाज संघटनेने कामथे उपजिल्हा रूग्णालयात 7 आयसीयूसह 30 बेडची व्यवस्था केली. दहा लाखाचा खर्च करून धार्मिकतेला व्यापक रूप दिले. कोरोना रोखण्यासाठी आम्ही सुद्धा प्रतिबद्ध आहोत. हे चिपळूण तालुक्यातील मुस्लीम समाजाने कृतीतून दाखवून दिले.

कामथे उपजिल्हा रूग्णालयात अनेक गैरसोयी असल्यामुळे तेथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेढांबे, सावर्डे, वहाळ फाटा येथे कोविड 19 सेंटर सुरू करण्यात आली. तेथे आवश्यक यंत्रणा उपलब्ध करताना कामथे उपजिल्हा रूग्णालयावर अधिक ताण येत होता. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कामथे उपजिल्हा रूग्णालय अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आवाहन केले. येथील चिपळूण तालुका मुस्लीम समाज संघटनेकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला.

हेही वाचा- अवघ्या तीन तासांत शाळा रेडी टू टीच ; गावाने श्रमदानातून केली उभी शाऴा...
 

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रित बैठक घेवून कामथे उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चिपळूणच्या प्रांताधिकार्‍यांची भेट घेवून रूग्णालयासाठी कोणत्या प्रकारची मदत करावी लागणार आहे. हे समजून घेतले. मुस्लीम समाजातील दानशूर व्यक्तींनी रोख रक्कम दिली. उर्वरित रक्कम संघटनेकडून देण्यात आली. असे एकत्रित दहा लाख जमले. या पैशाने रुग्णालयातील तीन वोर्डांची रंगरंगोटी आणि किरकोळ दुरूस्ती करण्यात. या वार्डसाठी 30 बेडची व्यवस्था करण्यात आली. तसेच 7 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली. 6 लिटरचे 3 नवीन गिझर रूग्णालयात बसवण्यात आले. नूतनीकरण केलेल्या या वार्डचे लवकरच उद्घाटन होणार आहे. 

हेही वाचा- सिंधुदुर्गातील धबधबे, निसर्ग तुम्हाला खुणावतील़ पण तेथे जाता येणार नाही.....काय आहे कारण वाचा

कामथे उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींमुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना अनंत अडचणी येत होत्या. चिपळूण तालुका मुस्लीम संमाज संघटनेकडून तीन वार्ड सुसज्ज करून देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे शक्य होणार आहे. 

डॉ. संतोष हंकारे, कामथे उपजिल्हा रूग्णालय, 

 सम्राज्यवादी राष्ट्रांनी लादलेल्या कोरोना संकटाला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. हा संसर्ग रोखण्यासाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला आहे. मुस्लिमांच्या संदर्भातील सामाजिक कर्तव्याची अध्यात्मिक संहिता, पवित्र कुराणाने ठरवून दिलेली आहे. त्या आधाराने लॉकडाऊन काळात मजुरांच्या कुटूंबियांना अन्नधान्य व त्यांच्या उपजिविकेसाठी गरजेच्या वस्तू पुरवण्यात आल्या. या संघटनेकडून कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले हे कौतूकास्पद आहे. 

डॉ. वैभव विधाते, मुख्याधिकारी चिपळूण पालिका
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh rupees spent for Kamath sub-district hospital for Muslim community