दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावंतवाडीकर रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुलवामा येथे जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीकर रस्त्यावर उतरले. सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहात बंद ठेवत निषेध फेरीत सहभाग घेतला.

सावंतवाडी -  पुलवामा येथे जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीकर रस्त्यावर उतरले. सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहात बंद ठेवत निषेध फेरीत सहभाग घेतला.

हजारो नागरिक शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले होते. गांधी चौक येथे जमलेल्या नागरिक व शाळा महाविद्यालयीन तरुणांनी यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गली गली मे शोर है पाकिस्तान चोर है, भारत माता की जय, निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है अशा घोषणांनी गांधी चौक व शहर परिसर दणाणून सोडला. शहरातील मुख्य परिसरात फेरी काढण्यात आली. या मिरवणुकीचे नेतृत्व शाळकरी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी उपस्थितांनी पुलवामा येथे हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

फेरीमध्ये मिलाग्रीस हायस्कूल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, कळसुलकर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज,भोसले पॉलिटेक्निकल नॉलेज सिटी, डॉ. जे बी नाईक आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयाक विद्यारर्थी सहभागी झाले होते. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी आमदार राजन तेली, काँग्रेस शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, संजू परब, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, मनोज नाईक, बापु गव्हाणकर, अतुल पेंढारकर, राजन आंगणे, आनंद नेवगी, ऍड परिमल नाईक , सुधीर पराडकर, जगदीश मांजरेकर, दीपक सावंत,प्रशांत मोरजकर, अल्ताफ खान आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist Attack Protest in Sawantwadi