

Silver Streak in Nashik: Rutuja Patere Shines with Multiple Medals in State Athletics
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील रामवाडी गावची कन्या आणि सध्या ठाणे येथील संभाजीनगर भागात स्थायिक असलेल्या ऋतुजा राजू पातेरे हिने आपल्या देदीप्यमान कामगिरीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नाशिक येथे २ आणि ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ऋतुजाने २००, ४०० आणि ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे.