esakal | बांदा येथील मुलांना वाढलेले जेवण म्हणजे ईश्वरसेवा- अनुराधा पाटकर
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा येथील मुलांना वाढलेले जेवण म्हणजे ईश्वरसेवा- अनुराधा पाटकर

बांदा येथील मुलांना वाढलेले जेवण म्हणजे ईश्वरसेवा- अनुराधा पाटकर

sakal_logo
By
पराग गावकर

कळणे: गणपती जवळ आले की रानोमाळ हिंडून माटविचे सामान जमवायचे. बाजारात उभं राहून ते विकायचे. आणि मिळालेल्या पैशातून स्वतःसाठी काहीतरी कपडे घ्यायचे एवढेच ज्यांच्या आयुष्यात गणपती उत्सवाला स्थान होते, त्या कातकरी समाजातील मुलांना यंदा बांदयाच्या पाटकर कुटुंबियांनी गणेशाच्या मुर्तीपूजेचा मान दिलाय.

हेही वाचा: Ratnagiri : चौपदरीकरणाच्या कामांमुळे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक

अगदी मामाच्या घरच्या गणपतीला जावे आणि मौज करावी त्या प्रकारे ही मुलं अनुराधा पाटकर यांच्या घरात वावरत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे संतांची जिवंत माणसातही दैवत्व असते त्याचा सन्मान म्हणजेच देवाची पूजाअर्चा ही शिकवण प्रत्यक्षात उतरली आहे.

आज गणेशोत्सवाचे पारंपरिक रूप बदलले. निसर्ग पूजेचे तत्व मागे पडत गेले आणि उत्सवही 'मार्केट' शी जोडला गेला. त्यामुळेच यंदाच्या गणपती तशी 'तेजी' दिसना नाय, गणपतीचा मार्केट यंदा जरा 'डाऊन'च दिसता, अशी चर्चा आपल्याला हमखास ऐकू येते. म्हणजेच उत्सव हे आता वस्तूशी जोडले जात आहेत.

पण आजही काही कुटुंबे उत्सवातील पारंपरिक थाट सांभाळत त्याला सामाजिक समरसतेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक बांद्यातील अनुराधा रुपेश पाटकर यांचा घरगुती गणपती.

हेही वाचा: छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

गेली अनेक वर्षे त्यांच्या कुटुंबाकडून साजरा होणारा गणपती उत्सव हा वैशिष्ट्यपर्ण राहिला आहे. मुळात आपल्याकडे घरच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना घरातील पुरुष पूजा करून करतात. त्यासाठी पुरोहित बोलावले जातात. मात्र गेल्या अनेक वर्षात सौं. पाटकर या स्वतः गणपतीची पूजा करत आहेत. आज गणेशाच्या मूर्ती शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आढळतात. मात्र पटकरांच्या घरातील मुर्ती ही पाण्यात विसर्जित न करता पुढील वर्षाला तिचेच पूजन केले जाते.

गेल्या काही वर्षात त्यांचा घरगुती गणपती हा केवळ त्यांचाच राहिलेला नाही. समाजातील अनेक घटक आजही अस्पृश्य, वंचित अशा अवस्थेत आहेत. पांढरापेक्षा मानसिकतेचा समाजघटक आजही अशा वंचित घटकना बंधुत्वाच्या पातळीवर जवळ करत नाही. अशा समाजातील बालमनाना गणेशचतुर्थीतील मौजमस्ती ची अनुभूती देणे हीच खरी गणेशपूजा अशी पाटकर यांची श्रद्धा! त्यामुळेच आजही गणसमाज पद्धतीचे अवशेष ज्या 'कातकरी' समाजात सापडतात, त्या समाजातील मुलांना पाटकर कुटुंबियांनी आमंत्रित केलं.

त्यांच्या झोपडीतील जगण्याला छेद देत पाच दिवसांच्या गणपतीच्या नित्य पूजेचा मान पाटकर कुटुंबियांनी कातकरी वस्तीमधील आठ मुलांना दिला. एरव्ही शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवतील 'मुखदर्शन' यापुरताच मर्यादित असलेला या मुलांचा यंदाचा गणपती उत्सव पाटकर कुटुंबियांनी घरचा गणपती असा केला.

त्यांच्या घरात स्वतःच्या घराप्रमाणे आज ही मुलं बांगडताना दिसत आहेत. यांच्या पिढ्यानंपिढ्यात कधी मातीच्या पार्थिव मूर्तित प्राणप्रतिष्ठापना झाली नसेल, मात्र यंदा पार्थिवात प्राणप्रतिष्ठापना करण्याची संधी वंचित घटकांना देऊन पाटकर कुटुंबाने सचेतन घटकला सन्मान दिला. निर्गुण निराकार असलेल्या परमेश्वराला निर्जीव दगडात न शोधता सजीव संवेदनेत शोधले.

आज सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा सामाजिक उपक्रमानी साजरे होताना दिसतात. मात्र घरगुती गणपतीला सामाजिक बनवणारे दुर्मिळच. गेल्या काही वर्षात सविता आश्रम मधील मुलांना घरी आणणे, बांदयातील भटक्या समाजातील मुलांना घरी आणून प्रसाद देणे आदी गोष्टी पाटकर यांनी केल्यात. खरं तर या उत्सवला उपक्रम वगैरे म्हणणं पण त्यांना मान्य नाही.

याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अनुराधा पाटकर म्हणाल्या, "खरे देवपण दगड-मातीत नव्हे तर सजीव घटकात असते. त्यामुळे उत्सवाच सेलिब्रेशन करण्यापेक्षा जिवंत घटकाना सन्मान मिळवून देणे, ही भागवत धर्माची, संत वारकरी संप्रदायची शिकवण प्रत्यक्षात आणणे म्हणजे खरी देवपूजा आहे.

पाच दिवस कातकरी समाजातील ही मुलं सकाळ-संध्याकाळच्या पूजेसह सगळ्या गोष्टी स्वतः करतात. आमच्या घरचा गणपती त्यांचा गणपती झाला हेच आमच्यासाठी उत्सवापेक्षा आनंददाई आहे, कोकणात राहून ज्यांच्या आयुष्यात कधी गणपती पुजला गेला नाही, पण आज त्यांना आमच्याकडून ही संधी मिळाली. हीच आमची खरी अष्टविनायक यात्रा आहे."

loading image
go to top