"ते' सत्तेशिवाय जगूच शकत नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

माणगाव - माणगाव तालुक्‍यातील निजामपूर विभाग हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. यापुढील काळातही हा विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहील, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. "काही माणसे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा' या शब्दांत त्यांनी वारंवार पक्ष बदलणाऱ्यांवर टीका केली. 

निजामपूर विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निजामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष बाबूराव भोनकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता बक्कम, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी रणपिसे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे आदी उपस्थित होते. 

तटकरे म्हणाले की, गळतं तिकडे दुर्लक्ष करा, आजच्या उपस्थितीने मी समाधानी आहे. काही माणसे सत्तेशिवाय जगूच शकत नाहीत. ही माणसे न केलेल्या कामांचा दावा करण्याचा प्रयत्न करतात. या माणसांना समाजाशी देणे-घेणे नसते. ती केवळ स्वार्थ साधत असतात. ठेका घेणे व आपला स्वार्थ साधणे एवढाच धंदा या माणसांचा आहे. म्हणूनच ते वारंवार पक्ष बदलत असतात. राजू साबळे नावाची कोणी व्यक्ती अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत गेली होती. जिल्हा परिषदेतील एका पदाच्या लाचारीने ते जाहीरपणे जाऊ शकले नव्हते. या माणसांना दर पाच वर्षांनी पक्ष बदलण्याची सवय आहे. आता त्यांची शिवसेनेत अडीच वर्षे झाली आहेत. उरलेल्या अडीच वर्षांनंतर ते अन्य पक्षात जातील. उद्धव ठाकरेंनी त्यांचा पुरेपूर फायदा उठवावा! या लोकांच्या राजकारणात स्थिरता नाही. त्यांनी निजामपूरचे दत्तूशेठ पवार, सुधीर पवार व ऍड. राजीव साबळे यांच्यावरही जोरदार टीका केली. 

"गीतेंनी मोदींशी डोळा भिडवावा' 
केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यावर अनंत गीते हे रोह्यात येऊन राजीनाम्याची भाषा बोलू लागले. या गीतेंनी राजीनामा सोडाच; पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन देऊन फक्त त्यांच्या डोळ्यात डोळे भिडवून दाखवावे, असे आव्हान सुनील तटकरे यांनी दिले.

Web Title: they can not live without power