esakal | 'तिसरी लाट येऊ नये, पण आपण सज्ज राहूया'; फडणवीसांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

'तिसरी लाट येऊ नये, पण आपण सज्ज राहूया'; फडणवीसांचे आवाहन

लसीकरण वेगाने केल्यास तिसऱ्या लाटेपासून संरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या आहेत.

'तिसरी लाट येऊ नये, पण आपण सज्ज राहूया'; फडणवीसांचे आवाहन

sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोकणातील भाजपच्या सर्व आमदारांनी निधी देऊन कोविड सेंटर्स उभी केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करूया. तसेच तिसरी लाट येऊ नये, परंतु दुर्दैवाने तिसरी लाट आली, तर सज्ज राहून, व्यवस्था उभी केली पाहिजे. लसीकरण वेगाने केल्यास तिसऱ्या लाटेपासून संरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या आहेत, असे प्रतिपादन विधानसभेचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या कोकणातील आमदारांनी दिलेल्या निधीतून कोविड सेंटर्सचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी लांब जावे लागत होते, त्यावेळी मंत्री नारायण राणे यांनी जागा दिली. सव्वा कोटी रुपये खर्चून सिंधुदुर्गसाठी अत्याधुनिक पहिले सेंटर उभे केले. एका बाजूला तिसरी लाट येण्याची भीती असल्याने २० ते २५ हजार नागरिकांना सुविधा दिल्या जातील.

हेही वाचा: Ratnagir Rain Update: कोळकेवाडीत वीजनिर्मिती बंद; संगमेश्वरात पूर

प्रसाद लाड म्हणाले, तौक्ते चक्रीवादळावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी मिश्रा, के. मंजुलक्ष्मी कोविडचे प्रमाण जास्त असल्याने व्यवस्था कमी पडते. प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर भाई गिरकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील प्रसाद लाड यांच्या माध्यमातून प्रत्येकी ३५ लाखाचा निधी दिला. चार कोविड सेंटरची ऑक्सिजन पाईपलाईन, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासह केली आहे. नीलेश राणे यांनी ऑक्सिजन पुरवठा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तिसरी लाट येण्याची भिती असल्याने ही सेंटर्स उभी केली आहेत. रत्नागिरीसाठी लागणारा पॅरामेडिकल स्टाफ, ऑक्सिजन गरजेप्रसंगी दिली जाईल.

मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड सेंटरमध्ये सुविधा निर्माण केल्या आहेत. तिसरी लाट येणार नाही. तरीही आपण खबरदारी घेऊयात. गणपतीचा सण मोठ्या पद्धतीने साजरा होणार आहे. जनतेला आवाहन करूया, सण साजरा करताना आरटीपीसीआर करायची नाही. कोविड सेंटरमध्ये जाणार नाही, याची दक्षता घेऊया. रत्नागिरीत जिल्हा क्रीडा संकुल येथे लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभे केले आहे. डॉ. चव्हाण यांचे हॉस्पीटल ताब्यात घेऊन सेंटर केले आहे. कोविड सेंटरमध्ये पॅरामेडिकल व नर्स स्टाफ द्यावा लागेल. कोविड सेंटर निर्माण करत असताना भविष्यात कोविड सेंटर रुग्ण जाणार नाही, एवढी दक्षता सर्व आमदारांनी घेऊया.

हेही वाचा: शिवसेना पदाधिकाऱ्याच्या थेट अंगणात बिबट्या; कुत्र्यांवर मारली झडप

भाजपाचे नीलेश राणे म्हणाले, प्रसाद लाड यांनी कोविड सेंटर उभी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रत्नागिरीमध्ये आरोग्य सुविधा कमी आहेत. आपल्याला निर्माण कराव्या लागल्या. रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग, रायगडपेक्षा अनेक वर्षांनी मागे आहे. पायाभूत सुविधांसाठी नवे काही करण्याची गरज आहे. कोविडचे मृत्यू, पायाभूत सुविधांची वनवा आहे. ग्रामीण भागातील रस्ते खराब आहेत. अनेक विकासकामांपासून वंचित आहे, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू उपस्थित होते.

दरम्यान ऑनलाइन माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री अनिल परब, आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार संजय केळकर उपस्थित होते.

loading image
go to top