पोलादपूरची हिमहिरकणी समृध्दीचा तिसरा विश्वविक्रम

सुनील पाटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

महाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर नुकत्याच तिस-या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. 17 हजार फुटापेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे सलग सर करणारी ती जगातील पहिली लहान गिर्यारोहक ठरली असुन, चिल्ड्रन रेकाँर्ड बुकने तशी नोंद घेऊन समृध्दीला प्रमाणपत्र दिले आहे.

केवळ अकरा वर्षाची असताना समृध्दीने पहिला विश्वविक्रम केला. हिमालयातील 17 हजार 500 फुट उंचीचे फ्रेंडशिप शिखर सर करणारी जगातील ती पहिली बाल गिर्यारोहक ठरली .त्यानंतर तीच्या हिमालयान मोहिमा सुरुच राहिल्या त्यामध्ये तिने एवी पिक नावाचे अनोखे शिखर सर केले ,हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली सर्वात लहान गिर्यारोहक मुलगी ठरली हा तिचा दुसरा विश्वविक्रम नोंदला गेला. तर नुकताच नोंद घेण्यात आलेला तिसरा विश्वविक्रम म्हणजे लागोपाठ दोन हिमशिखर सर करण्याचा. यामध्ये तिने सोळाव्या वर्षी 11 मे 2016 ला 18 हजार 712 फुट उंचीचे कालापत्थर शिखर सर केले तर 12 मे 2016 ला 17 हजार 510 फुट उंचीचे एवी पिक शिखर  सर केले. लागोपाठ 17 हडार 500 फूट उंचीची दोन शिखरे सलग सर करणारी ती जगातील पहिली लहान गिर्यारोहक ठरली असुन तशी चिल्ड्रन रेकाँर्ड बुकने तशी नोंद घेऊन प्रमाणपत्र दिले आहे.

समृध्दीची झेप उत्तुंग शिखराकडे जात असतानाच तिची लहान बहिण प्रचितीने अथांग सागराकडे झेप घेतली आहे. प्रचितीने अंडरवाँटर स्पोर्टस् मध्ये पॅडी कोर्स ट्रेनिंग नुकतेच गोवा येथे यशस्वीपणे पूर्ण केले असुन स्कुबा डाईव्ह मध्ये पॅडी कोर्स करणारी ती कोकणातील पहिली मुलगी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलादपूरच्या कर्तव्य प्रतिष्ठानतर्फे कोकण जलकन्या पुरस्कारानी प्रचिती प्रशांत भूतकर हिचा तर तिसर-या विश्व विक्रमा बद्दल हिमहिरकणी समृद्धी भुतकर हिचा सत्कार करण्यात आला..

Web Title: The third world record of the samruddhi