रत्नागिरी : गणेशभक्तांसाठी हजारांहून अधिक एसटी

रत्नागिरी : गणेशभक्तांसाठी हजारांहून अधिक एसटी

रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडण्यात येतात. रत्नागिरी विभागामार्फत परतीच्या प्रवासासाठी १०३५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महामंडळाने ६० दिवस आधीच आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

परगावी असणारे चाकरमानी कितीही अडचणी आल्या, तरी गणेशोत्सवासाठी गावी येतात. गावी येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडल्या जातात. कोकणात गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त जादा  बसेसची सोय केली आहे. आरक्षण सुरू झाले आहे. प्रथमच प्रवाशांना जाता-येतानाचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा दिली आहे. यापूर्वी ती ३० दिवस होती.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गणेशोत्सवात येणाऱ्या प्रवाशांचा एसटी गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास खोळंबा होऊ नये यासाठी गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. कशेडी, चिपळूण येथे तपासणी नाका, संगमेश्वर येथे दुरुस्ती पथक, चिपळूणमध्ये क्रेन ठेवण्यात येणार आहे. चिपळूण ते राजापूर मार्गावर गस्ती पथकाची नियुक्ती केली आहे. रात्रीच्या दोन ड्यूटीमध्ये गस्तीपथक सर्व मार्गावर फिरणार आहे. नवीन चालकांना आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. प्रत्येक आगाराला पालक अधिकारी नियुक्त करण्यात येईल.

हंगामी जादा फेऱ्या
दापोली ८, खेड १२, चिपळूण ११, गुहागर १२, देवरूख १७, रत्नागिरी १२, लांजा ७, राजापूर २, मंडणगड १२ अशा १०८ हंगामी जादा फेऱ्या व ९२७ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. ७ रोजी १२२, ८ रोजी ३३६, ९ रोजी २५९, १० रोजी १४३, ११ ला २७, १२ ला १४, १३ रोजी १३ तर १४ रोजी १३ गाड्या सोडण्यात येतील. या फेऱ्यांमध्ये वाढ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com