देवरुख एसटी आगारातून तीन बस धावल्या; कर्मचारी अजुनही मागण्यांवर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुख एसटी आगारातून तीन बस धावल्या; कर्मचारी अजुनही मागण्यांवर ठाम

देवरुख एसटी आगारातून तीन बस धावल्या; कर्मचारी अजुनही मागण्यांवर ठाम

रत्‍नागिरी (साडवली) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांनी महामंडळ शासनाकडे विलणीकरण व्हावे व अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन छेडले असताना व आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरु असताना गुरुवारी २५ तारखेला दुपारी तीन वाजता देवरुख संगमेश्वर,देवरुख पिरंवदने या मार्गावर दोन बस रवाना झाल्या. शुक्रवारी सकाळी आणखी काही बस सुटतील असेही सांगण्यात आले. माञ काही चालक,वाहक वगळता बाकी सगळे चालक,वाहक व कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

देवरुख एसटी आगारात ९ नोव्हेंबर पासुन कामबंद आंदोलन सुरु आहे.गेले सतरा दिवसानंतर देवरुख आगारातुन दोन बस धावल्या.देवरुख आगारातील टि.ए.जाधव,डी.टी.शिर्के,जे.डी.भोसले,एम.ए.शिंदे,या चालक,वाहकांनी कामावर हजर होत या फेर्‍या सुरु केल्या.देवरुख संगमेश्वर अशा दोन फेर्‍या व एक पिरंदवणे वस्तीसाठी बस धावली.

हेही वाचा: एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

पगारवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तरी विलिनीकरणाबाबत ठोस तोडगा न निघाल्याने संप अधिक चिघळला आहे.कामावर हजर व्हायचे नाही असा शपथपूर्वक निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे.संप सुरु होतानाच आगारप्रमुख गाडे यांनी कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हा असे आवाहन केले होते.माञ आपल्या मागण्यांवर ठाम रहात कर्मचार्‍यांनी संप सुरुच ठेवला आहे.जे चालक,वाहक हजर झाले आहेत तशा बस फेर्‍या सुरु झाल्या आहेत.देवरुख आगारातुन बस सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी तो क्षणभंगूर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

loading image
go to top