esakal | रत्नागिरीत आणखी 48 जणांना कोरोनाची बाधा ; तर तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

three more death corona positive patient in ratnagiri total death count 71

काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरीत आणखी 48 जणांना कोरोनाची बाधा ; तर तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात कोरोनाने आज आणखी 3 जणांचा मृत्यु झाला. यामुळे जिल्हयातील मृतांची संख्या 71 झाली आहे. तर काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 16 रुग्णांचा समावेश आहे.


कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. आज आणखी 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती वाढत आहे. आज राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला रुग्ण,  तसेच पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा (रत्नागिरी) येथील एक 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त :  लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू -


जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात रत्नागिरीतील 16 जणांचा समावेश आहे. यामध्ये आणखीन एक डॉक्टर पॉझिटिव्ह आला असून त्यांची आई शासकीय रुग्णालयात सेवा देत आहे. त्याही अगोदर पॉझिटिव आल्या होत्या आणि आज त्यांचा  डॉक्टर मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असणारे आणि पत्रकार त्यांचे वडील आज पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा-प्रवाशांसाठी सुचना : २० ऑगस्ट पर्यंत या पर्यायी मार्गावरुन धावणार कोकण रेल्वे,  असे आहे वेऴापत्रक वाचा -


आज सापडलेल्यांमध्ये चिपळूण 1, निवळी 1, कुवारबाव 1, थिबा पॅलेस 1, नाचणे गोडाऊन स्टॉप  1, कर्ला 1, गोळप 1, मांजरे  1 पालघर 1, जयगड 1, राधा कृष्ण टॉकीज जवळ 1, समित्र नगर 3, करबुडे 1 यांचा समावेश आहे.गेली दोन दिवस जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत नमुने तपासणी यंत्रणेमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने अहवाल प्रलंबित आहेत. आज उद्या दोन दिवसमध्ये हे प्रलंबित नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.  
हेही वाचा- वेंगुर्लेत गणेशोत्सवात रस्त्यावरील बाजार बंद -

तालुकानिहाय मृतांची आकडेवारी
रत्नागिरी - 19
खेड - 6
गुहागर - 2
दापोली - 14
चिपळूण - 13
संगमेश्वर - 7
लांजा - 2
राजापूर - 7
मंडणगड    -1                    

संपादन - अर्चना बनगे