चिपळुणातील दुकान फोडणारे तीन चोरटे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

चिपळूण - बाजारपेठेतील दुकान लुटणाऱ्या तसेच वालोपे येथून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत चोरट्यांकडून दुकानातील सिगारेट, तंबाखू, चॉकलेटचे बॉक्‍स आदी व दुचाकी ताब्यात घेतली. या तिघांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तिघेही चिपळूणचे आहेत.

चिपळूण - बाजारपेठेतील दुकान लुटणाऱ्या तसेच वालोपे येथून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत चोरट्यांकडून दुकानातील सिगारेट, तंबाखू, चॉकलेटचे बॉक्‍स आदी व दुचाकी ताब्यात घेतली. या तिघांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तिघेही चिपळूणचे आहेत.

चिपळूण बाजारपेठेतील राममोहन गजानन भोसले यांचे होलसेल विक्रीचे दुकान आहे. 10 नोव्हेंबरला चोरट्यांनी 1 लाख 50 हजार 454 रुपयांची सिगारेट, तंबाखू, चॉकलेट बॉक्‍स आदी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. खबऱ्यांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोरटे शहरातील एका पान टपरीवर माल विक्रीस जाणार असल्याचे समजले. त्यांच्यावर दोन दिवस पाळत ठेवण्यात आली. चोरट्यांनी काही वस्तू डोंगरात लपवल्या होत्या. उर्वरित वस्तू पान टपरीवर विक्रीस आणतानाच त्यांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. या कारवाईत बाजारपेठेतील साहिल प्रशांत खातू (19) याला 25 नोव्हेंबरला ताब्यात घेतले. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून 77 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता वालोपे येथून एक दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले.

वालोपे येथील संतोष सखाराम बाद्रे यांची दुचाकी 2 जून 2016 ला चोरीस गेली होती. या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून त्याचा वापर सुरू होता. दुचाकी चोरी प्रकरणात सहभाग असलेल्या नयन अनिल गांधी (19, रा. खेड, चिपळूण) याला गोव्यातून ताब्यात घेतले. नयन व अल्पवयीन चोरट्याने दुचाकीची चोरी केली होती. नयन हा गोव्यास कामानिमित्त वास्तव्यास होता. पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रदीप गमरे, गणेश पटेकर, योगेश नार्वेकर, दीपक ओतारी, सचिन जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, अटक केलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. याचा तपास प्रदीप गमरे करीत आहेत.

Web Title: Three theft arrested

टॅग्स