धरणाबाबत तिवरेकरांनी केलाय `हा` ठराव

Tiware Resolution On Dam Project Ratnagiri Marathi News
Tiware Resolution On Dam Project Ratnagiri Marathi News

चिपळूण ( रत्नागिरी ) - तिवरे धरणाच्या दुरूस्तीसाठी 9 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र मातीच्या धरणाला तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. कॉंक्रिटचे नवीन धरण बांधावे असा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे. 

तिवरे धरणफुटीनंतर आठ महिन्याने धरणाच्या पुनर्बांधणीची चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलैच्या रात्री मुसळधार पावसात 28 लाख घनमीटर पूर्ण पाण्याने भरलेले तिवरे धरण फुटले आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. यामध्ये प्रचंड मनुष्य व वित्तहानी झाली. शासनाने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली असली तरी पुनर्वसनासह अन्य प्रश्न कायम आहेत. आता धरण पुनर्बांधणीची चर्चा सुरू झाली आहे.

आमदार शेखर निकम यांनी धरण बांधण्यासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले आहे. मातीचे हे धरण मधोमध फुटले होते. त्यातच अतिवृष्टीत धरणाच्या डोंगराकडील भागात पडलेल्या भेगांमुळे उर्वरित भागही धोकादायक बनला आहे. त्यामुळे फुटलेल्या धरणाच्या मध्यापासून भेगा गेलेल्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत धरण बांधण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यासाठी प्राथमिक 9 कोटीच्या खर्चाला मान्यता दिली असल्याचे पुढे येत आहे. 

मातीचे धरण फुटल्याने पुन्हा मातीचे धरण बांधू नये, या मतावर ग्रामस्थ ठाम आहेत. मातीचे धरण बांधून पुन्हा भीतीच्या छायेत ग्रामस्थांना राहायचे नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दुरूस्तीत फुटलेल्या धरणाचा अर्धा भाग जोडू नये. त्यापेक्षा पूर्णपणे कॉंक्रिटचे धरण बांधले जावे. शिवाय सुमारे तीनशे हेक्‍टर क्षेत्र हे धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने याचाही मातीचे धरण बांधताना विचार होणे गरजेचे आहे. या संदर्भात ग्रामसभेत करण्यात आलेल्या ठरावाला सूचक म्हणून मंगेश शिंदे तर सूचय शिंदे यानी अनुमोदन दिले आहे. याबाबत आमदार, खासदार, मंत्री यांच्या स्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com