देवरूख ः त्रयी तालुकाप्रमुखाच्या शोधात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः त्रयी तालुकाप्रमुखाच्या शोधात
देवरूख ः त्रयी तालुकाप्रमुखाच्या शोधात

देवरूख ः त्रयी तालुकाप्रमुखाच्या शोधात

sakal_logo
By

माने-बने-महाडीक त्रयी तालुकाप्रमुखाच्या शोधात

संगमेश्‍वरमध्ये शिवसेना गट बांधून ठेवण्याचे आव्हान; कार्यकर्त्यांत संभ्रम
देवरूख, ता. ३ ः रवींद्र माने यांच्या कृपेने तालुकाप्रमुख पदावर विराजमान होऊन जिल्ह्याच्या सेनेच्या इतिहासात विक्रमी २७ वर्षे तालुकापदावर असलेले मराठा समाजाचेच प्रमोद पवार यांनी सहकाऱ्यांसह गुपचूप शिंदे गटात प्रवेश करून नेत्याना व शिवसेनेला धक्का दिला. यानंतर एकही निष्ठांवत शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करू नये, यासाठी या माने-बने-महाडीक त्रयीने कंबर कसली असली तरी प्रमोद पवारांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नवीन तालुकाप्रमुखांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना १५ दिवस होऊन गेले तरी नवीन तालुकाप्रमुख पदाची घोषणा झाली नसल्याने कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेना फाटाफुटीचे लोण जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले असताना संगमेश्वर तालुक्यातही शिंदे गटाने जोरदार हातपाय पसरायला सुरवात केली. तालुकाप्रमुख प्रमोद पवारांसह काहीजणांना गळाला लावत शिंदे गटात सामिल करून घेत जोरदार धक्का दिला. या आधी १० वर्षे आमदारकी भोगलेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तेसह शिंदे गटाचा हात धरला. हे दोन्ही नेते शिवसेना फोडण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसले.
संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला निर्माण करणारे माजी मंत्री रवींद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांनी पुन्हा कंबर कसली असून, तालुक्यातील हा गड अभेद्य राहावा, तसेच खरी शिवसेना हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. रवींद्र माने व सुभाष बने, सहसंर्पक प्रमुख राजू महाडीक हे शिवसैनिकांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी आतूर झाले आहेत. आमच्या पक्षात तालुक्यात दिग्गज अनुभवी नेते असूनही या पदावर अजूनही निवड होत नसल्याने सैनिकांमध्ये चलबिचल वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. प. निवडणुकीत उबाठा सेनेने शिंदेगटासह सर्वच पक्षांना मागे टाकत आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. आता ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी नेते तालुक्यांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार ठाकरे गटाचेच दक्षिण जिल्हाप्रमुख नियुक्त आहेत. प्रमोद पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने रिक्त तालुकाप्रमुख पदावर अजुन नियुक्ती केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

चौकट
पक्षाची वाटचाल कठीण कालखंडातून
जिल्हा व तालुक्यात बहुसंख्य असलेल्या व शिवसेनेशी कायम एकनिष्ठ असलेल्या वा राहिलेल्या कुणबी समाजातून या पदावर निवडीसाठी कधीच प्राधान्य दिले गेले नाही. ही वस्तूस्थिती पाहता नवीन नेमणुका करताना पक्ष या कठीण कालखंडातून जात असून तालुकाप्रमुख पदावर जनसामान्यांच्या कामाची जाण असलेला, सर्व समाजासह कार्यकर्ते यांना बरोबर घेत जाणारा आक्रमक नेतृत्व असलेला असावा यासाठी चाचपणी सुरू आहे.