Wed, Feb 8, 2023

खेड-फुरूसनजीक मोटार उलटली, प्रवासी जखमी
खेड-फुरूसनजीक मोटार उलटली, प्रवासी जखमी
Published on : 4 January 2023, 1:53 am
फुरूसनजीक मोटारीला अपघात
खेड ः खेड-दापोली मार्गावर फुरूस गावनाजीक कुवे घाटापासून जवळ मोटारील अपघात झाला. या अपघातामध्ये पुणे येथून पर्यटनासाठी आलेले तीन ते चार प्रवासी जखमी झाले. दापोली येथून खेडच्या दिशेने येत असताना कुवेघाट उतरल्यानंतर फुरूस गावच्या एका वळणाच्या ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात पडली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.